रत्नागिरी - कोकणातील शिमगोत्सवातील रंगपंचमी हा महत्त्वाचा दिवस. रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला चक्क पोलीस मानवंदना देतात. बंदूकधारी पोलीस एसएलआर बंदुकीच्या साहाय्याने पालखीला मानवंदना देतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली ही परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत अनुभवायला मिळते. पालखीला मानवंदना देण्याची परंपरा आजही रत्नागिरीत कायम आहे.
रत्नागिरीतला बारा वाड्यांचा मानकरी श्रीदेव भैरी. होळी उत्सवात विविध परंपरा पहायला मिळतात. तशीच पण जरा हटके परंपरा रंगपंचमीच्या दुपारी रत्नागिरीत पहायला मिळते. ही परंपरा आगळी वेगळीच म्हणावी लागेल. रंगपंचमी खेळायला भैैरीची पालखी गावात निघते. त्यावेळी निघणाऱ्या भैरी देवाच्या पालखीला सहाणेवरच पोलीस मानवंदना देतात. चार बंदूकधारी पोलिसांकडून मानवंदना देण्याची ही परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू आहे.
हेही वाचा - 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम वादात : 'हवा डोक्यात घुसली' - संभाजीराजे छत्रपती
आजही ही प्रथा शिमगोत्सवात तेवढ्याच भक्ती भावाने जपली जात आहे. अंगावर वर्दी घातलेले हे पोलीस पालखीला मानवंदना देतात. एसएलआर बंदुकीच्या माध्यमातून ही मानवंदना दिली जाते. मानवंदना देताना पोलिसांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळा भक्तिभाव असतो. हेच कोकणच्या शिमगोत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.