ETV Bharat / state

गुहागर विधानसभा मतदारसंघ : शिवसेना-भाजपच्या कुरघोडीत यंदाही होणार तिसऱ्याचाच लाभ? - शिवसेना भाजप युतीत कलह

राष्ट्रवादीचे घड्याळ उतरवत हातात शिवबंधन बांधलेल्या भास्कर जाधव यांच्या शिवसेनेतील घरवापसीमुळे गुहागर मतदारसंघातील चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. एकेकाळी भाजपचा अभेद्य गड समजला जाणाऱ्या गुहागर मतदारसंघावरून शिवसेना भाजप युतीत कलह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Sep 23, 2019, 3:58 PM IST

Updated : Sep 23, 2019, 6:18 PM IST

रत्नागिरी - एकेकाळी भाजपचा अभेद्य गड समजला जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघावर गेल्या एक दशकापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या महिनाभरात झालेली राजकीय उलथापालथ, यामुळे या मतदारसंघातील चित्र बदलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत 15 वर्षानंतर शिवसेनेत घरवापसी केली. त्यामुळे या जागेवरून सेना-भाजप युतीत कलह निर्माण झाला आहे.

भाजपने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. तर एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये आली असता भास्कर जाधवच या मतदारसंघातून लढणार असे संकेत दिले होते. त्यामुळे इथे शिवसेना-भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण खरी रंगत येतील ती युतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर आणि राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे ठरल्यावर. तसेच यावेळीही युतीतील भांडणात तिसऱ्याच उमेदवाराची सरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुहागर मतदारसंघावरून शिवसेना भाजप युतीत कलह निर्माण होण्याची दाट शक्यता

हेही वाचा... इतिहास 'मनसे' च्या बाजूने! शिवसेनाही कधी काळी होती अडचणीत

गुहागर मतदारसंघाचा इतिहास

1978 पासून गुहागर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीला जनता दल आणि त्यानंतर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. भाजप म्हणजेच पर्यायाने नातू कुटुंबाचं वर्चस्व, 1980 चा अपवाद सोडल्यास 2009 पर्यंत या मतदारसंघावर राहिले आहे. 2009 मध्ये युतीतील जागा वाटपामध्ये भाजपने हा मतदारसंघ तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यासाठी सेनेला सोडला आणि भाजपला इथं घरघर लागली. डॉ. विनय नातू यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष लढवली. रामदास कदम आणि डॉ. विनय नातू या दोघांमध्ये शिवसेना भाजपची मते विभागल्याने राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना एकप्रकारे इथे लॉटरी लागली. या निवडणुकीनंतर डॉ. विनय नातू पुन्हा भाजपमध्ये परतले. गेल्यावेळी (2014) त्यांनी भाजपकडून निवडणूकही लढवली. मात्र 2014 च्या निवडणूकीत शिवसेना - भाजप वेगवेगळे लढले होते. त्यामुळे नातू यांना पुन्हा अपयश आलं. त्यामुळे गेली 10 वर्ष भास्कर जाधव यांचेच मतदार संघात वर्चस्व आहे. सध्या भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे युतीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार यावर येथील राजकारणाची समीकरणे अवलंबून असणार आहेत.

शिवसेना - भाजपमध्ये तिढा

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पुन्हा ते येथूनच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये आल्यावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण पुन्हा भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी आणि विजयी मिरवणूकीला येऊ असे सांगित जाधवांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आपण गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या प्रचाराला येऊ, असे त्यावेळी जाहीर केले होते. तर दुसरीकडे भाजप मात्र या जागेसाठी आग्रही आहे. भाजपला हा मतदारसंघ सुटल्यास डॉ. विनय नातू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा रंगतदार इतिहास

कुणबी समाज महत्वाचा फँक्टर

भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे इथे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. भास्कर जाधव यांच्याबद्दल कुणबी समाजामध्ये नाराजी आहे. ही नाराजी गुहागर नगर पंचायत निवडणूकीवेळी दिसून आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. नऊ जागा मिळालेल्या शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल नगराध्यक्ष झाले. राजेश बेंडल यांचेच नाव सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती सहदेव बेटकर यांचेही नाव चर्चेत आहे. बेटकर यांना शिवसेनेच्या वरिष्ठांकडून यापूर्वी या मतदारसंघात तयारीला लागण्यास सांगण्यात आले होते, असे खुद्द बेटकर सांगतात. पण भास्कर जाधव यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बेटकर यांचे नाव मागे पडले आहे. अलिकडे बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीतून लढणार का याबाबत राजकिय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत. गुहागर मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदार कुणबी समाजाचे मतदार आहेत. बेटकर यांच्यामागे समाज भक्कमपणे उभा राहिल्यास या मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते.

overview of Guhagar vidhansabha constituency
गुहागर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?

निवडणूकीचे वर्ष, विजयी उमेदवार आणि पक्ष

  • 1978 - डॉ. श्रीधर नातू, जनता
  • 1980 - रामचंद्र बेंडल, काँग्रेस
  • 1985 - डॉ. श्रीधर नातू, भाजप
  • 1990 - डॉ. श्रीधर नातू, भाजप
  • 1993 - डॉ. विनय नातू, भाजप (पोटनिवडणूक)
  • 1995- डॉ. विनय नातू, भाजप
  • 1995 - डॉ. विनय नातू, भाजप
  • 1999 - डॉ. विनय नातू, भाजप
  • 2004 - डॉ. विनय नातू , भाजप
  • 2009 - भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस
  • 2014 - भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा... 'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'

Intro:गुहागर विधानसभा निवडणूक आढावा

गुहागर शिवसेना भाजप-शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा

यावेळीही शिवसेना-भाजपच्या कुरघोडीत
तिसऱ्याची सरशी होण्याची शक्यता..?

रत्नागिरी, प्रतिनिधी

एकेकाळी भाजपचा अभेद्य गड समजला जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघावर गेल्या एक दशकापासून मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र गेल्या महिनाभरात मोठी राजकिय उलथापालथ या मतदारसंघात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत 15 वर्षानंतर घरवापसी केली आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ उतरवत त्यांनी थेट शिवबंधन हाती बांधलं आहे. त्यामुळे या जागेवरून शिवसेना-भाजप युतीत कलह निर्माण झाला आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे, तर शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये आली असता त्यावेळी भास्कर जाधवच या मतदारसंघातून लढणार असे संकेत दिले होते. त्यामुळे इथं शिवसेना-भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. तर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही.. पण खरी रंगत येतील ती युतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर आणि राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे ठरल्यावर... पण यावेळीही दोघांच्या भांडणात तिसऱ्याच उमेदवाराची सरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

गुहागर मतदारसंघाचा इतिहास ..

1978 पासून गुहागर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीला जनता दल आणि त्यानंतर भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. भाजप म्हणजेच पर्यायाने नातू कुटुंबाचं वर्चस्व 1980 चा अपवाद सोडल्यास 2009 पर्यंत या मतदारसंघावर राहिलं आहे. 2009 मध्ये युतीतील जागा वाटपामध्ये भाजपने हा मतदारसंघ तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यासाठी शिवसेनेला सोडला.. आणि भाजपला इथं घरघर लागली. डॉ विनय नातू यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष लढवली. रामदास कदम आणि डॉ. विनय नातू या दोघांमध्ये शिवसेना-भाजपची मतं विभागल्याने राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना एकप्रकारे इथं लॉटरी लागली. या निवडणुकीनंतर डॉ. विनय नातू पुन्हा भाजपमध्ये परतले. गेल्यावेळी (2014) त्यांनी भाजपकडून निवडणूकही लढवली. मात्र 2014 च्या निवडणूकित शिवसेना - भाजप वेगवेगळे लढले होते. त्यामुळे नातूंंना पुन्हा अपयश आलं. त्यामुळे गेली 10 वर्ष भास्कर जाधव यांचं मतदार संघात वर्चस्व आहे. पण सध्या भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे युतीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार यावर इथल्या राजकारणाची समीकरण अवलंबून आहेत..

वर्ष - विजयी उमेदवार - पक्ष

1978 - डॉ. श्रीधर नातू - जनता

1980 - रामचंद्र बेंडल - काँग्रेस

1985 - डॉ. श्रीधर नातू - भाजप

1990 - डॉ. श्रीधर नातू - भाजप

1993 - डॉ. विनय नातू - भाजप (पोटनिवडणूक)

1995- डॉ. विनय नातू - भाजप

1995 - डॉ. विनय नातू - भाजप

1999 - डॉ. विनय नातू - भाजप

2004 - डॉ. विनय नातू - भाजप

2009 - भास्कर जाधव - राष्ट्रवादी काँग्रेस

2014 - भास्कर जाधव - राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना - भाजपमध्ये तिढा

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पुन्हा ते इथूनच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये आल्यावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यांनी आपण पुन्हा भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी आणि विजयी मिरवणूकिला येऊ असं सांगत जाधवांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आपण गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या प्रचाराला येऊ असं यावेळी जाहीर केलं होतं. तर दुसरीकडे भाजप या जागेसाठी आग्रही आहे. भाजपला हा मतदारसंघ सुटल्यास डॉ. विनय नातू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

कुणबी समाज महत्वाचा फँक्टर

भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे इथे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. भास्कर जाधव यांच्याबद्दल कुणबी समाजामध्ये नाराजी आहे. ही नाराजी गुहागर नगर पंचायत निवडणूकीवेळी दिसून आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. नऊ जागा मिळालेल्या शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल नगराध्यक्ष झाले. राजेश बेंडल यांचंच नाव सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांचंही नाव चर्चेत आहे. बेटकर यांना शिवसेनेच्या वरिष्ठांकडून यापूर्वी या मतदारसंघात तयारीला लागण्यास सांगण्यात आलं होतं, असं खुद्द बेटकर सांगतात. पण भास्कर जाधव यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बेटकर यांचं नाव मागे पडलं आहे. अलिकडे बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीतून लढणार का याबाबत राजकिय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत. गुहागर मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदार कुणबी समाजाचे मतदार आहेत. बेटकर यांच्यामागे समाज भक्कमपणे उभा राहिल्यास या मतदारसंघात कांटे की टक्कर पहायला मिळू शकते..

Byte -
1) भास्कर जाधव, आमदार
2) आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
3) डॉ.विनय नातू, माजी आमदार
4) ऍड. दीपक पटवर्धन, भाजप जिल्हाध्यक्षBody:गुहागर विधानसभा निवडणूक आढावा

यावेळीही शिवसेना-भाजपच्या कुरघोडीत
तिसऱ्याची सरशी होण्याची शक्यता..?Conclusion:गुहागर विधानसभा निवडणूक आढावा

यावेळीही शिवसेना-भाजपच्या कुरघोडीत
तिसऱ्याची सरशी होण्याची शक्यता..?
Last Updated : Sep 23, 2019, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.