रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील समर्पित कोविड रुग्णालयाच्या 200 बेडचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील 30 बेडच्या समर्पित कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव तसेच आमदार राजन साळवी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
असे आहे रुग्णालय
20 किलोलिटर साठवण क्षमता असणारा लिक्विड ऑक्सिजन टॅंक असणार आहे
ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात 30 बेडचे समर्पित कोविड रुग्णालय झाले आहे. या ठिकाणी व्हेंटीलेटर सह 5 बेडचा अद्ययावत असा अतिदक्षता कक्ष आहे. ओणी येथील हे रुग्णालय आमदार राजन साळवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 89 लक्ष रुपये देऊन सुरु केले आहे.
लोकार्पण
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेली दोन्ही रुग्णालयांमधील सुविधांबाबतची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे लोकांपर्यंत पोहचेल याचीही व्यवस्था करण्यात आली होती. ओणी येथील समर्पित रुग्णालय इमारतीजवळ टिव्हीच्या माध्यमातून उपस्थितांनी हा लोकार्पण सोहळा बघितला.
हेही वाचा-कोरोनाचा सक्षमपणे सामना करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यास प्राधान्य द्या - मुख्यमंत्री