रत्नागिरी - तिवरे धरण प्रकरणात अधिकारी आणि ठेकेदारांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी आज तिवरे गावातील ग्रामस्थांची घटनास्थळी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तिवरे दुर्घटना म्हणजे एक ठरवून केलेला कट आहे. जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारावर तसेच आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची आपण भेट घेणार असल्याचेही राणे यावेळी म्हणाले. १० वर्षांपूर्वी झालेले धरण आणि त्या धरणासाठी लागलेले १४ कोटी रुपये हे सगळे पैसे गेले कुठे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.