रत्नागिरी - भाजपला अधिकाधिक बळकट करण्यासाठी एकत्रितरीत्या काम करूया, येणारा भविष्यकाळ येथील जनता आणि पक्षाच्या दृष्टीने उज्ज्वल करूया. असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप जिल्हा कार्यालयात केले. राणे यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची करणार पाहणी
राणे यांच्या भेटीवेळी कार्यालयात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाला जिथे गरज असेल तिथे मी उभा राहणार अशी ग्वाही राणे यांनी दिली.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, रत्नागिरी भाजपला कणखर नेतृत्वाची गरज आहे ती पूर्ण झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे आहेत. आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी तुम्ही आम्हाला हवे आहात. पुढील काळात पुन्हा रत्नागिरी जिल्हा भाजपमय करण्यासाठी आपण सर्व एकत्र काम करूया.
पटवर्धन म्हणाले, निलेश राणे यांच्याशी अनेकदा बोलणे झाले पण सुरुवातीला अगदी औपचारिक आणि देशाच्या अर्थ विषयाशी, जडणघडणीविषयी चर्चा करत होतो, आता राजकीय चर्चा होत आहे. पण दोन्ही विषयात सखोल ज्ञान असणारी व्यक्ती भाजपसोबत आल्याने आता भाजपचे कुटुंब वृद्धिंगत होणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजेश सावंत, मंदार मयेकर, मनोज पाटणकर यांच्यासह मुन्ना खामकर, नित्यानंद दळवी, अशोक वाडेकर, संजय यादव, संकेत चावंडे, मेहताब साखरकर, विजू गांधी आदी मान्यवर उपस्थित होत.
हेही वाचा - शिवसेनेने अगोदर भाजपसोबतचे संबंध तोडावेत - नवाब मलिक