रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातही वादळाने मोठं नुकसान झालं आहे, मात्र प्रशासन भरपूर ठिकाणी कमी पडत असल्याची खंत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त भागाचा निलेश राणे यांनी दौरा केला. या दौऱ्यात त्यांना प्रशासनाच्या बाबतीत जे दिसून आलं ते त्यांनी आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदर्शनास आणून दिलं.
प्रशासन कमी पडतंय - राणे
याबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले, की जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. जनावरं मेली आहेत, दोन दोन दिवस वीज नाही, प्रशासन कुठेतरी कमी पडतंय, कुठेकुठे प्रशासन कमी पडत आहे, हे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. मी स्वतः राजापूर, लांजा रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, परिस्थिती अतिशय भयावह आहे, या नुकसानीचं मोजमाप कधी होणार, पंचनामेच अजून पूर्ण झालेले नाहीत, तर नोंद कधी होणार. आशा स्थितीत अधिकारी कमी पडत आहेत. परिस्थिती भयावह आहे, आशा परिस्थितीत त्यांना धीर देण्याची गरज आहे, मात्र हे ठाकरे सरकार करेल असं वाटत नाही, अशी टीका राणे यांनी यावेळी केली.
हेही वाचा - 'बार्ज पी३०५' बचावकार्य : पाहा बचावकार्याचे फोटो