रत्नागिरी - जिल्ह्यात शुक्रवारी (28 मे) ४१६ नवे कोरोना रुग्ण आढळले. याची माहिती जिल्हा रुग्णालयाने जाहिर केली. तर दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
३३७३ रुग्ण अॅक्टिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील काल (28 मे) आलेल्या आकडेवारीनुसार, ४१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १९० रुग्ण आरटीपीसीआर, तर २२६ रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याची एकूण कोरोना बाधितांची संख्या ३५ हजार ४२ वर गेली आहे. त्यातील ३० हजार ५०० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सद्या ३३७३ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
११ जणांचा मृत्यू
शुक्रवारी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या ११ मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ८ मृत्यू झाले. याशिवाय गुहागर २ आणि राजापूर तालुक्यात एका मृत्यूची नोंद आहे. आतापर्यंत एकूण ११६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा दर ३.३३ टक्के तर पॉझिटिव्हिटी दर १७.६२ टक्के झाला आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात वडील व दीड वर्षाच्या बाळाचे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह