ETV Bharat / state

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा - increased electricity bill MNS protests

वाढीव वीजबिलांविरोधात आज रत्नागिरीतसुद्धा मनसेने धडक मोर्चा काढला. रत्नागिरीतील मारुती मंदिरापासून या मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा पायी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी करण्यात आली.

MNS opposes increased electricity bill
वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचा मोर्चा
author img

By

Published : Nov 26, 2020, 4:03 PM IST

रत्नागिरी - वाढीव वीजबिलांविरोधात आज रत्नागिरीतसुद्धा मनसेने धडक मोर्चा काढला. रत्नागिरीतील मारुती मंदिरापासून या मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा पायी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वाढीव वीजबिलांचे विरोध करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

वाढीव वीजबिलांविरोधात मनसेने राज्यात एल्गार पुकारला आहे. राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला आहे. रत्नागिरीतही मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्हाभरातील मनसैनिक या मोर्चाला उपस्थित होते.

मनसेची जोरदार घोषणाबाजी

बंद करा बंद करा सामान्य जनतेला त्रास देणे बंद करा, वाढीव वीजबिल माफ झालेच पाहिजे, राज साहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

माहिती देताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर

हे फसवे आणि खोटे सरकार - वैभव खेडेकर

हे फसवे आणि खोटे सरकार आहे. गेल्या वर्षभरात सर्वच स्तरावर अपयशी ठरलेले हे सरकार आहे. या सरकारने राज्यात खोट बोलले आहे. लॉकडाऊनमधील बिले आम्ही माफ करतो, तुम्हाला लवकरच आम्ही गोड बातमी देतो, परंतु अशी गोड बातमी देण्याची धमक आणि क्षमता या मुख्यमंत्र्यामध्ये आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नसल्याची टीका मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केली. तसेच, वीजबिल माफी मिळाली नाही, तर यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला.

मोर्चापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. रत्नागिरीतसुद्धा मोर्चा काढण्यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसांची तमा न बाळगता मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा - रत्नागिरी : देवस्थानांचे कर्मचारी व पुजाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.