ETV Bharat / state

आ. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी - निलेश राणे

8 नोव्हेंबरच्या एका शिवसेनेच्या कार्यक्रमात जाधवांनी दारू विकणाऱ्या शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाची पाठराखण केली होती. तसेच पोलीस देखील हफ्ते घेत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला होता. यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे.

Nilesh Rane Bhaskar Jadhav
आ. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी - निलेश राणे
author img

By

Published : Nov 18, 2020, 2:31 PM IST

रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे आणखी एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. 8 नोव्हेंबरच्या एका शिवसेनेच्या कार्यक्रमात त्यांनी दारू विकणाऱ्या शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाची पाठराखण केली होती. तसेच पोलीस देखील हफ्ते घेत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला होता. यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी पोलिसांचा अपमान केला असून त्यांनी पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

आरोप सिद्ध करावा लागेल..

माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी पोलिसांचा अपमान केला आहे, व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार भास्कर जाधव कार्यकर्त्यांला सांगतात की, तू दारू अनधिकृतपणे विक, पोलिसवाले काय हप्ता घेत नाहीत काय, ही भाषा एका लोकप्रतिनिधीची आहे. मला लाज वाटते की, हे कोकणातले आमदार आहेत. भास्कर जाधवांचा वैयक्तिक भाग असला, तरी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला आहे. पोलिसांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्र पोलिसांवर आरोप करताना त्यांच्याकडे पुरावे आहेत का? पोलिसांनी कुठे हफ्ते मागितले किंवा असे काही केले, याचे पुरावे आहेत का? महाराष्ट्र पोलिसांबद्दलचा हा आरोप जाधव यांना सिद्ध करावा लागेल. भास्कर जाधव यांनी पोलिसांचा अपमान केलेला आहे, यामध्ये दुमतच नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांनी माफी मागून त्वरित पुरावा द्यावा, ही आमची मागणी असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

आ. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी - निलेश राणे

"स्वतःच्या मतदारसंघात वाटोळं केलं. बेरोजगारी आहेच तसेच त्यांच्या मतदारसंघात रस्तेदेखील खराब आहेत. नशिबाने सगळी मोठी पदं यांना मिळाली. मात्र भास्कर जाधव यांनी मतदारसंघाला आणि कोकणाला काहीच दिलं नाही. त्यांना कोकणात काडीची सुद्धा किंमत नाही. कारण दुसऱ्यावर टीका करण्यापलीकडे यांना काहीच जमलेलं नाही." अशीही टीका भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले होते आ. भास्कर जाधव..

गुहागर येथे एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 8 नोव्हेंबर रोजीचा हा व्हिडीओ आहे. केवळ उपतालुकाप्रमुखाची पाठराखण करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिस देखील हफ्ते घेत नाहीत का? असा सवाल देखील केला. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका, मुलींची छेडछाड आणि चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे, असं विधान देखील यावेळी भास्कर जाधव यांनी केलं होतं.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड : लघुशंका करण्यावरून हटकल्याने सुरक्षा रक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.