रत्नागिरी Minister Samant On Flyover Collapsing: निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळल्यामुळे चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, याची (Uday Samant) दक्षता घेण्याची सूचना केल्याच्याही पालकमंत्री सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (बुधवारी) सकाळी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रातांधिकारी आकाश लिगाडे उपस्थित होते. (Inspection of bridge accident by Uday Samant)
समितीकडून दुर्घटनेची चौकशी: रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मुख्य अभियंत्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक अडचणीमुळे ही दुर्घटना झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या नेमलेल्या समितीकडून या दुर्घटनेची चौकशी होईल. ही समिती शहानिशा करेल, त्यांच्या चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी 10 तारखेपर्यंत सर्व्हीस रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुलाचे काम सुरू राहील. आजपासून सर्व्हिस रोडचे काम सुरू होईल. भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही सूचना केली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील पूल कोसळला: मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख इथल्या गर्डरला तडा गेलेला पूल लाँचरच्या यंत्रणेसह सोमवारी दुपारी कोसळला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेची तातडीनं दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पहाटे दुर्घटनास्थळी चार वाजता भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार तसंच शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजेश सावंत, अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित होते.
कशी झाली दुर्घटना: मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख इथला गर्डर तुटलेला पूल लाँचरच्या यंत्रणेसह सोमवारी दुपारी कोसळला. यावेळी मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग देखील काही काळ ठप्प झाला होता. मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका इथं सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर सोमवारी सकाळी 8 वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी 2.45 वाजता हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेनं चिपळुणात एकच खळबळ उडाली. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचीही धावाधाव झाली. तर काहीकाळ महामार्ग ठप्प झाला होता.
हेही वाचा:
- Chiplun Bridge Collapse : चिपळूणमध्ये पूल दुर्घटना; मंत्री रवींद्र चव्हाणांनी पहाटे चार वाजता केली पाहणी, म्हणाले . . .
- Young Man Killed: गणेशोत्सवात घराबाहेर सफाई करताना मलबा कोसळून तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
- Bhiwandi Building Collapsed: भिवंडीत दोन मजली इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू