ETV Bharat / state

आजपासून यांत्रिक मासेमारी 2 महिने बंद, कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या - यांत्रिक मासेमारी बंद

कोकण किनारपट्टीवर आजपासून 2 महिने यांत्रिक मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे आता कोकणातल्या किनाऱ्यावर बोटी विसावल्या आहेत. शिवाय, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही मत्स्य खात्याने म्हटले आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी
author img

By

Published : Jun 1, 2021, 6:39 PM IST

रत्नागिरी - मान्सून येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. मात्र, सध्या कोकण किनारपट्टीवर लगबग सुरू आहे ती मच्छिमारांची. कारण, आजपासून (1 जून) या हंगामातील कोकणातला मच्छिमारी हंगाम थंडावणार आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत यांत्रिक मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे आता कोकणातल्या किनाऱ्यावर बोटी विसावल्या आहेत.

आजपासून यांत्रिक मासेमारी 2 महिने बंद, कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या

बंदी का?

महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार, 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंदी घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळतो. त्यामुळे मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येते.

या मासेमाऱ्यांना बंदी नाही

पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही. बिगर यांत्रिक बोटींना खाडीपात्र हवामान शांत असताना किनाऱ्यालगत मासेमारी करता येऊ शकते.

आदेश मोडल्यास कारवाई

मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै असा एकूण 61 दिवसांचा असणार आहे. मात्र, बंदी आदेश मोडल्यास नौका, मासळी जप्त करण्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य खात्याने दिला आहे.

जिल्ह्यात 40 बंदरे

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर आहे. जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे ४० बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ५९८ नौका आहेत. यामध्ये सर्वाधिक २ हजार ४५० नौका यांत्रिक आहेत. तर उर्वरित २०० नौका बिगर यांत्रिक आहेत. यापैकी ८० टक्के नौका किनाऱ्यावर आणण्याचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा - साताऱ्यात कोरोना सदृष्य लक्षणे असलेले हजारावर रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.