ETV Bharat / state

Maharashtra Political crisis: उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे उत्तम उदाहरण- योगेश कदम - योगेश कदम यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा म्हणजे राजकीय अपरिपक्वता काय असते, याचे उत्तम उदाहरण त्यांनी संपूर्ण देशाला दिलेले आहे, अशी टीका खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केली आहे. ते दापोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका संघटक प्रदीप सुर्वे, ममता शिंदे आदी उपस्थित होते.

MLA Yogesh Kadam
आमदार योगेश कदम
author img

By

Published : May 12, 2023, 9:31 AM IST

Updated : May 12, 2023, 2:11 PM IST

राजकीय बुद्धिमत्ता कमी पडल्यावर पराभव होतो- योगेश कदम, आमदार

रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे, जर का राजीनामा दिला नसता, तर आम्ही तुमचे सरकार पुन्हा स्थापित करू शकला असता. परंतु राजीनामा दिल्याने पुन्हा मागे जाऊन हे सरकार स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे मला वाटते, त्यांच्या आजूबाजूचे जे सल्लागार आहेत, ते किती ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. 2019 ला ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी झाली, त्यांच्या सल्ल्यामुळेच तुमचे सरकार पडले. आतातरी डोळे उघडा, त्यांना बाजूला करा, शहाणे व्हा असा उपरोधीक टोला आमदार योगेश कदम यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री पद मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मिळवणे सोपे असते. परंतु, त्या पदाला न्याय देणे किंवा त्या खुर्चीवर बसल्यानंतर जी जबाबदारी येते, ती जबाबदारी पार पाडणे हे तितकेच कठीण असते. किंबहुना मुख्यमंत्री पदाचे अधिकार, राजीनामा दिल्यानंतर काय होते राजीनामा न दिल्यानंतर काय होते, याबाबतीत राजकीय अपरिपक्वता काय असते? याचे उत्तम उदाहरण आज उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशाला दिलेले आहे. - योगेश कदम

खुर्चीच्या हट्टापायी पक्ष संपवला : आमदार योगेश कदम म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संभ्रमावस्थेत असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक हे शिवसेना पक्षाकडे येतील, त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना खुर्ची व राष्ट्रवादी सोडवत नव्हती. त्यांनी खुर्चीच्या हट्टापायी आपला पक्ष संपवला. मात्र आता आमचा पक्ष हाच शिवसेना पक्ष असल्याचे व आम्ही शिवसेनेचे असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आता संभ्रमावस्थेत असणारे अनेकजण आपल्याकडे येतील, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.

राजकीय बुद्धिमत्ता जेव्हा कमी पडते, त्यावेळी राजकारणात पराभव होतो. याचे उदाहरण संपूर्ण उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशाला घडवून दिलेले आहे- योगेश कदम

कार्यकाळ पूर्ण करणार : सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे आम्ही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार यात शंका नाही. या उरलेल्या काळात विकास कामांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा वेळ आपल्याकडे नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच विधिमंडळात शिवसेना या नावाचा एकच पक्ष आहे. त्या पक्षाचे भरत गोगावले हे प्रतोद आहेत. आता शिवसेना चिन्हावर निवडून आलेल्या सर्वांना भरत गोगावले यांचा निर्णय हा मान्य करावा लागेल, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकार हे घटना व संविधानानुसार : निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, हे गुरूवारी न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे, त्यामुळे पक्ष हा कुणाचा आहे हा प्रश्न संपुष्टात आला आहे. आम्ही शिवसेना पक्षाचे आहोत व शिवसेना पक्ष आपला आहे. सोळा आमदार अपात्रतेबाबत विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वाना न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळालेला आहे. आपले सरकार घटनाबाह्य असल्याच्या टीकेला देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळालेला आहे. आपले सरकार हे घटनेनुसार व संविधानानुसार असल्याचे कोर्टाच्या निकालाने सिद्ध झाले आहे, असे देखील आमदार योगेश कदम यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Danve On Political Crises : शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य; नैतिकतेने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अंबादास दानवे

हेही वाचा : Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी धरला ठेका; पाहा व्हिडिओ

हेही वाचा : Ajit Pawar On SC Verdict : सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Last Updated : May 12, 2023, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.