रत्नागिरी - खेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि जिल्ह्याताल शहरामधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते खेडमधून निघाले होते.
हे ही वीचा - शिवसेना उपनेते उदय सामंत यांचे रत्नागिरीतील 'हे' बॅनर्स ठरत आहेत लक्षवेधी
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीमध्ये येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरीमधील खड्डेमय रस्त्यांचा निषेध करण्यासाठी खेड काँग्रेसचे कार्यकर्ते येत होते. तत्पुर्वी पोलिसांनी या निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले आहे. खेड पोलिसांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतिबांसह १५ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सध्या खेड पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. मात्र, निषेधासाठी खेडमधून निघतानाच खेड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
हे ही वाचा - ...म्हणून बारामतीतील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली - रोहित पवार