रत्नागिरी - जनता कर्फ्युमुळे आज रस्ते, बाजारपेठा सुन्या सुन्या झाल्या आहेत. कोणीही बाहेर फिरताना दिसत नाही. संपूर्ण रत्नागिरीत अशीच स्थिती आहे. मात्र, या स्थितीतही सफाई कामगार आजही आपल्यासाठी रस्त्यावर दिसत होते. रत्नागिरी नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांनी आजही आपले कर्तव्य चोखपणे बजावले.
शहराची स्वच्छता हा महत्त्वाचा भाग असतो. जर परिसर अस्वच्छ असेल तर अनेक रोगराईंना आपसूक निमंत्रण मिळते. एक दिवस जरी कचरा उचलला गेला नाही तर दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सफाई कर्मचारी ठिकठिकाणचा परिसर साफ करणे, कचरा उचलण्याचे काम करत होते. त्यांचे हे काम खरंच कौतुकास्पद असून कोरोनाविरोधातील लढाईत त्यांनी मोठा वाटा उचलला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
हेही वाचा - महाबळेश्वर, पाचगणी नगरपरिषद हद्दीतील अनिवासी व्यक्तींना उद्या 12 पर्यंत जिल्हा सोडण्याचे आदेश
हेही वाचा - कोरोनाचा हायव्होल्टेज इफेक्ट, वीजबिल आकारणी पद्धत बदलणार