रत्नागिरी- जिल्हा प्रशासनाच्या कडक लॉकडाऊन नंतर, सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या लॉकडाऊनचा कोणताच परिणाम रुग्णसंख्या रोखण्यासाठी झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी १२ रुग्णांचा व गेल्या काही दिवसात १६ रुग्णांचा असे २८ मृत्यू झाल्याचे, जिल्हा रुग्णालयाने शनिवारी जाहीर केले. त्यामुळे एकूण मृत्यूच्या संख्या १५०१ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत ४३ हजार ३७८ पॉझिटिव्ह रुग्ण
शनिवारी जिल्ह्यात ३ हजार ७७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४२६ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, तर ३ हजार ३५३ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत २ लाख ०४ हजार २६४ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ४३ हजार ३७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ७१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत ३७ हजार ७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या ४१७३ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मृत्यूची संख्या १५०१
शनिवारी दिवसभरात १२ रुग्णांचे तर यापुर्वीचे १६ रुग्णांचे मृत्यू जिल्हा रुग्णालयाने जाहीर केले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५०१ झाली आहे. मृत्यूचा दर ३.४६ टक्के झाला आहे. शनिवारी जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळले , तर २८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क - डॉ. अर्चना भोसले