रत्नागिरी - भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवरून शिवसेनेने भाजपला चिमटे काढले आहेत. एकनाथ खडसेंनी कुठल्या पक्षात जावं, हा त्यांचा प्रश्न आहे, पण ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी जिवाचं रान केलं, त्या व्यक्तीवर अशी पक्ष सोडण्याची वेळ येणं दुदैवी असल्याचं मत शिवसेना प्रवक्ते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी सामंत म्हणाले की, खडसे एक मोठे नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावे, हे यापूर्वीही मी विधान केलं होतं. आजही माझी तीच इच्छा असल्याचं शिवसेना प्रवक्ते उदय सामंत म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत अडाळी एमआयडीसीत होणाऱ्या प्रकल्पाबाबत आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांचं आश्वासन - उदय सामंतसिंंधुदूर्गातील अडाळी एमआयडीसीत होणारा आयुर्वेदिक वनस्पती संशोधन प्रकल्प इथंच होणार असेल तर आणि तरच आम्ही त्याला परवानगी देवू असं आश्वासन आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलं असल्याची माहिती सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, या संदर्भात आज श्रीपाद नाईक यांच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं. तसेच मंजूर झालेला एखादा प्रकल्प अन्य जिल्ह्यात नेणं योग्य नाही, हे आमचे खासदार विनायक राऊत यांचं म्हणणं आहे, या मताला माझे सुद्धा समर्थन आहे असं सांगत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देखमुखांवर निशाणा साधलाय. अनिल देशमुख हे माझे मित्र आहेत त्यांची हि भुमिका म्हणजे पूर्ण काँग्रेसची भुमिका नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.