ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे आरोग्य देखील महत्त्वाचे - खा. विनायक राऊत - Shivsena latest news

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. प्रभू रामचंद्र हे केवळ भाजपचेच आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.

Vinayak Raut
विनायक राऊत
author img

By

Published : Jul 30, 2020, 8:21 AM IST

रत्नागिरी- शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत गणेशोत्सव, राम मंदिर भूमिपूजन आणि नाणार प्रकल्प याविषयांवर संवाद साधला. गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांचे आरोग्य देखील महत्त्वाचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यास उशीर होत असल्याची बाब मान्य आहे. पण, याबाबतचा निर्णय घेत असताना कोकणात कोरोना वाढणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय लाखोंच्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांचे आरोग्य देखील महत्त्वाचे असल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. रत्नागिरी येथे आले असता ते बोलत होते. दरम्यान राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाही, या मुद्यावरुन त्यांनी भाजपला फटकारले.

विनायक राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर प्रहार केला आहे. प्रभू रामचंद्र केवळ हे केवळ भाजपचेच आहेत हे दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे. राम मंदिर निर्मीतीचा मार्ग ज्यांच्या ज्यांच्या प्रयत्नातून होतोय त्यांची जाणीव ठेवणे आज आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होत नाही, कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामजन्मभूमीत गेले तर राम मंदिराचे श्रेय शिवसेनेला जाईल, त्याची भाजपला भीती वाटत असेल, असे मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

ऑनलाईन भूमिपूजन करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुचवलेला पर्याय योग्यच असल्याचे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो लोकांना एकत्र बोलणवणे योग्य नाही, असे करणे आयसीएमआरच्या निर्णयाचे उल्लंघन करणारे असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

नाणार रिफायनरी संदर्भात केंद्राकडून राज्याला कुठलाही अल्टिमेटम नाही, आशा वावड्या म्हणजे प्रकल्पाच्या दलालांनी उठवलेली आरोळी आहे. स्थानिकानी म्हटले तर सरकार नाणारचा करार करायला तयार आहे. मात्र, सध्या स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध त्यामुळे प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.