ETV Bharat / state

...अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडू  : निलेश राणे - माजी खासदार निलेश राणे बातमी

रत्नागिरी बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

Nilesh Rane
निलेश राणे
author img

By

Published : Mar 29, 2021, 2:52 PM IST

Updated : Mar 29, 2021, 3:42 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू, असा इशारा माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी बाजार समितीला दिला आहे.

Nilesh Rane
निलेश राणे यांचे ट्विट

हेही वाचा - शरद पवार-अमित शाह यांची भेट झाली तर यात चुकीचं काय : संजय राऊत

ट्विटच्या माध्यमातून इशारा

या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून, ते यामध्ये म्हणतात की, रत्नागिरी बाजार समितीने शेतकऱ्यांवर दरोडा टाकण्याचा नवा मार्ग शोधला आहे. शेतमालाच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांना दंडाच्या पावत्या दिल्या जात आहेत. बाजार फीच्या नावाखाली या पावत्या दिल्या जात असून, आमचे बीजेपीचे सहकारी पोलीस तक्रार करत आहेत. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे ऑफिस फोडून टाकू' असा इशारा या ट्विटच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

रत्नागिरी बाजार समितीमध्ये काही वर्षांपूर्वी मच्छी वाहतुकीवर देखील अशा प्रकारे वसुली केली जात होती. त्यावेळी देखील निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचे बाजार समिती लक्ष बनले होते. त्यावेळी केलेल्या आंदोलनामुळे अखेर बाजार समितीने मच्छी वाहतुकीवरच आकारण्यात येणारा दंड वसूल करणे बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या रत्नागिरी बाजार समितीच्या अडचणी वाढणार असून शेतमालावर आशाप्रकारे कर किंवा दंड आकारणे बेकायदेशीर असल्याने समितीने ते तत्काळ थांबवले नाही तर पुन्हा समिती लक्ष ठरणार, हे माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून दिसून येत आहे.

हेही वाचा - 'द एव्हर गिव्हन' : सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची अखेर सुटका

Last Updated : Mar 29, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.