रत्नागिरी - भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रहार केला आहे. निलेश राणे यांचा आज रत्नागिरीत भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको का? आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, शपथ घेतो उपमुख्यमंत्री पदाची, आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो. त्यांंच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार यांच्यासोबत उभे केले जाते, तोच माणूस भाजपवर टिका करतो आणि आपण सहन करायची का? असा सवाल करत माजी खासदार निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.