ETV Bharat / state

'मुख्यमंत्र्यांना ना राज्याचा भूगोल माहीत, ना इतिहास' - Nilesh Rane CM Uddhav Thackeray

रत्नागिरीत भाजपच्या वतीने सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांना ना राज्याचा इतिहास माहीत, ना भूगोल आणि गणित माहीत असल्याचे म्हटले.

भाजप धरणे आंदोलन रत्नागिरी
माजी खासदार निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
author img

By

Published : Feb 25, 2020, 2:29 PM IST

रत्नागिरी - महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपने आज (मंगळवारी) राज्यभर धरणे आंदोलन केले. रत्नागिरीतही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राणे यांनी, महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

माजी खासदार निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका...

राज्याचे सध्या जे मुख्यमंत्री आहेत. त्यांना ना इतिहासाची माहिती आहे, ना भूगोलाची माहिती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र अडकलेला आहे, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

हेही वाचा... अमरावती : गरम पाण्याचा नळ तुटल्याने चार विद्यार्थी भाजले, एकाची प्रकृती चिंताजनक

या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. दीपक पटवर्धन, तालुकाप्रमुख सुशांत चवंडे, अ‌ॅड. विलास पाटणे, सचिन वहाळकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजप सध्या आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सरकार विरोधात भाजपने राज्यभर मंगळवारी धरणे आंदोलन केले. रत्नागिरी जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

भाजप-शिवसेनेला मिळालेला महाजनादेश झुगारून तीन भिन्न विचारसरणी फक्त सत्तेसाठी एकत्र आल्या आहेत. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, हे एक स्थगिती सरकार आहे. कोकणातील बहुतांश विकासकामांना स्थगिती दिल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. विकासकामे थांबल्याने कोकणचा विकास थांबला आहे, अशी टीका यावेळी सरकारवर करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.