ETV Bharat / state

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर - ratnagiri ganeshotsav rules news

जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये आता गणेशोत्सवासाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे.

ratnagiri ganeshotsav rules news
ratnagiri ganeshotsav rules news
author img

By

Published : Aug 29, 2021, 4:03 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये आता गणेशोत्सवासाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. हे रिपोर्ट 72 तासापूर्वीचे असणे बंधनकारक असणार आहे. पण, ज्या व्यक्तीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशा व्यक्तीला मात्र हा रिपोर्ट लागू नाही. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेली व्यक्ती कोणत्याही रिपोर्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू शकते. तसेच ज्या व्यक्तीकडे आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट नसणार आहे, अशा व्यक्तींची जिल्ह्यात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. या शिवाय, कोरोना वाढीला निमंत्रण मिळणार नाही, अशी काळजी घेण्याचे आवाहनदेखील यावेळी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

अशा आहेत मार्गदर्शक सूचना -

  • मागील अनुभव लक्षात घेता गणेशोत्सव व त्यानंतर येणाऱ्या सणांमुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने त्रिसूत्री घालून दिली आहे. योग्यप्रकारे मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे-सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुऊन स्वच्छता राखणे, या बाबींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
  • गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील, त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तथापि ज्या प्रवाशांनी अथवा व्यक्तींनी लसीचे दोन डोस पूर्ण केले नसतील, अशा व्यक्तीची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. चाचणीमध्ये ज्या व्यक्ती कोरोनाबाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात रहाणे बंधनकारक असेल.
  • रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधी RTPCR चाचणी केलेली असल्यास प्रवेशाच्या वेळी त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
  • रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत. तथापि प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे व त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल.
  • गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारण्यात येतील. जेणेकरुन वाहन चालकाला थोडीशी विश्रांती मिळू शकेल. त्याचबरोबर प्रवाशांना आरोग्य विषयक मदत व सुविधाही या स्वागत केंद्रात उपलब्ध होऊ शकेल.
  • जिल्ह्यातील महामार्गावरुन गणेशभक्तांचा प्रवास व वाहतूक सुरळीतपणे सुरु रहाण्यासाठी वाहतूक नियंत्रक पोलीस यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
  • गणेशोत्सव कालावधीत अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्यांवरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याबाबतचे दिवस निश्चित करण्यात येतील.
  • महामार्गावर आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहिका व इतर यंत्र सामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत.
  • गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणपती बसविण्यात येऊ नयेत, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तथापि, सार्वजनिक गणपती बसविल्यास तो दिड दिवसाचा असावा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी कमीत कमी लोकांची उपस्थिती ठेवणे व कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर राहील.
  • श्रीगणेश आगमन व विसर्जन यावेळी मिरवणूक काढण्यात येऊ नये.
  • गणेशोत्सव काळात आरती, भजन, किर्तन, जाखडी या सारख्या कार्यक्रमांना गर्दी करण्यात येऊ नये. हे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावरच करावे.
  • शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी.
  • गणेशत्सवामध्ये सजावट, आरास करताना शासनाने प्रतिबंधित केलेले प्लॅस्टीक, थर्माकोल याचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करावी. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये व अशा मूर्तीचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे.
  • श्रीगणेशाचा प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा, सुके पदार्थ, पूर्ण फळ याचा प्रसाद द्यावा.
  • मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणेबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.
  • गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण कटाक्षाने टाळावे. गणेशोत्सवामध्ये दर्शन, भजन, किर्तन, जाखडी इत्यादी कार्यक्रमांसाठी नातेवाईक, मित्रमंडळी यांचे घरी जाणे-येणे टाळावे.
  • गणेशमूर्ती विसर्जन घराच्या आवारात करावे. घरच्या-घरी गणेश विसर्जन करणे शक्य नसेल तर कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या तलाव, हौद यामध्ये गर्दी न करता करावे.
  • स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदा तलाव यांची निर्मिती करावी. तसेच निर्माल्य टाकणेसाठी निर्माल्यकलशांची ठिकठिकाणी निर्मिती करावी. इतर जलस्त्रोतांमध्ये मूर्ती किंवा निर्माल्य यांचे विसर्जन केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यामार्फत गणेशमूर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी, जेणे करुन गर्दी टाळणे शक्य होईल.
  • गणेशोत्सव कालावधीत विद्युत पुरवठा अखंडीत राहील यासाठी विद्युत वितरण कंपनीने दक्ष रहाण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
  • कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम, सूचना पाळून रत्नागिरीकरांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

हेही वाचा - स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे - नारायण राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.