ETV Bharat / state

अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव करत असल्याचा भाजी विक्रेत्या महिलांचा आरोप

रत्नागिरीत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अतिक्रमण हटाओ मोहिमेला भाजी विक्रेत्या महिलांनी विरोध केला. त्यामुळे भाजीविक्रेते आणि महिला यांच्यातील वाद हातघाईवर आला.

author img

By

Published : Mar 8, 2019, 9:29 PM IST

अतिक्रमणास विरोध करणाऱ्या भाजीविक्रेत्या महिला

रत्नागिरी - नगरपरिषदेने अतिक्रमणविरोधी धडक कारवाई सुरू केली. मात्र, अतिक्रमण हटाओ मोहिमेला गालबोट लागले आहे. भाजीविक्रेते आणि पालिका यांच्यातील वाद हातघाईवर आला आहे. मारूती मंदिर येथे मुख्य रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात रत्नागिरी नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला.यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कर्मचाऱ्यांना अटकाव केला आणि प्रकरण हातघाईवर आले.

परराज्यातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे सोडून स्थानिकांवर कारवाई होत असल्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. अखेर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यापर्यंत गेले. सरकारी कामात अडथळा केला म्हणून स्वाभिमानच्या आणि भाजी विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रत्नागिरी नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना भाजी विक्री करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप भाजीविक्रेत्या करणाऱ्या महिलांनी केला आहे.

अतिक्रमणाविरोधात विरोध करणाऱ्या भाजीविक्रेत्या महिला

महिलांनी याविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, महिलांबाबत एवढा गंभीर प्रकार होऊनही शहर पोलीस संबंधित व्यक्तींवर गुन्हा का दाखल करत नाही, असा प्रश्न भाजीविक्रेता महिलांनी उपस्थित केला. पोलिसांकडून विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप भाजीविक्रेता महिलांनी केला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्याने भाजीविक्रेत्या महिला सध्या आक्रमक झाल्या आहेत.

Intro:Body:

http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Ratnagiri/2019/03/08172535/Disputes-Between-Vegetable-Vendors-And-MNP-Officers.vpf

Disputes Between Vegetable Vendors And MNP Officers In Ratnagiri

Crisis, howckers, MNP, officer, encroachment, ratnagiri, नगरपरिषद, अतिक्रमण, कर्मचारी

अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव करत असल्याचा भाजी विक्रेत्या महिलांचा आरोप

रत्नागिरी - नगरपरिषदेने अतिक्रमण विरोधी धडक कारवाई सुरू केली. मात्र, अतिक्रमण हटाओ मोहिमेला गालबोट लागले आहे. भाजीविक्रेते आणि पालिका यांच्यातील वाद हातघाईवर आला आहे. मारूती मंदिर येथे मुख्य रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात रत्नागिरी नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला.यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कर्मचाऱ्यांना अटकाव केला आणि प्रकरण हातघाईवर आले.

परराज्यातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे सोडून स्थानिकांवर कारवाई होत असल्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. अखेर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यापर्यंत गेले. सरकारी कामात अडथळा केला म्हणून स्वाभिमानच्या आणि भाजी विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रत्नागिरी नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना भाजी विक्री करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप भाजीविक्रेत्या करणाऱ्या महिलांनी केला आहे.

महिलांनी याविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, महिलांबाबत एवढा गंभीर प्रकार होऊनही शहर पोलीस संबंधित व्यक्तींवर गुन्हा का दाखल करत नाही, असा प्रश्न भाजीविक्रेता महिलांनी उपस्थित केला. पोलिसांकडून विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप भाजीविक्रेता महिलांनी केला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्याने भाजीविक्रेत्या महिला सध्या आक्रमक झाल्या आहेत.

------------------------------------------------------------------------------------

Intro:अतिक्रमण हटाव मोहीम

अतिक्रमण हटाव मोहीम  नगरपालिका आणि पोलीस दुजाभाव करत असल्याचा भाजी विक्रेत्या महिलांचा आरोप

नगरपालिका आणि पोलीस दुजाभाव करत असल्याचा भाजी विक्रेत्या महिलांचा आरोप

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपरिषदेने अतिक्रमण विरोधी धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र अतिक्रमण हटाओ मोहिमेला गालबोट लागलं आहे.भाजीविक्रेते आणि पालिका यांच्यातील वाद हातघाईवर आला. मारूती मंदिर इथं मुख्य रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात रत्नागिरी नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कर्मचाऱ्यांना अटकाव केला. आणि प्रकरण हातघाईवर आलं. परराज्यातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचं सोडून स्थानिकांवर कारवाई होत असल्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.. मात्र कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सध्या सोलश मिडियावरून या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अखेर हे प्रकरण शहर पोलिस स्थानकापर्यत गेलं. सरकारी कामात अडथळा केला म्हणुन स्वाभिमानच्या आणि भाजी विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर रत्नागिरी नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना भाजी विक्री करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप भाजीविक्रेत्या करणाऱ्या महिलांनी केला आहे. महिलांनी याविरोधात पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र महिलांबाबत एवढा गंभीर प्रकार होऊनही शहर पोलीस संबंधित व्यक्तींवर गुन्हा का दाखल करत नाही, असा प्रश्न भाजीविक्रेता महिलांनी उपस्थित केलाय. पोलिसांकडून विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप भाजीविक्रेता महिलांनी केलाय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्याने भाजीविक्रेत्या महिला सध्या आक्रमक झाल्या आहेत..

बाईट-१- भाजी विक्रेत्या महिला.Body:अतिक्रमण हटाव मोहीम

नगरपालिका आणि पोलीस दुजाभाव करत असल्याचा भाजी विक्रेत्या महिलांचा आरोप

Conclusion:अतिक्रमण हटाव मोहीम

नगरपालिका आणि पोलीस दुजाभाव करत असल्याचा भाजी विक्रेत्या महिलांचा आरोप

-----------------------------------------------------------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.