ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर

मुख्यमंत्री ठाकरे रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे येथे दाखल होतील.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 16, 2020, 8:20 PM IST

रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून (सोमवारी) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री नाणार प्रकल्पाबद्दल काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी मुख्यमंत्री रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे येथे दाखल होतील. यावेळी विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडा बाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे.

मुख्यमंत्री नाणारबद्दल काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये शनिवारी कोकण आवृत्तीत पहिल्या पानावर रिफायनरीची माहिती देणारी जाहिरात आली होती. त्यामुळे शिवसेनेची भूमिका बदलली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात नाणारबाबत काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.