ETV Bharat / state

Tiware Dam Accident : तिवरे धरणफुटी दुर्घटनेच्या 2 वर्षानंतर 10 बाधित कुटुंबांना मिळाळा हक्काचा निवारा - तिवरे धरणफुटी दुर्घटना

तिवरे धरणफुटी दुर्घटनेच्या 2 वर्षानंतर दुर्घटनेतील 10 बाधित कुटुंबांना आज आपले हक्काचे घर मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पहिल्या 10 घरांचे ऑनलाईन लोकार्पण आज करण्यात आले. उर्वरीत घरांसाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

chief-minister-uddhav-thackeray
chief-minister-uddhav-thackeray
author img

By

Published : Jul 2, 2021, 6:39 PM IST

रत्नागिरी - तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. याच दिवशी चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटले होते आणि 22 घरे, मंदिर, जनावरांचे गोठे वाहून गेले होते. या दुर्घटनेत 22 जणांचे बळी गेले. अनेक कुटुंब या दुर्घटनेमुळे उद्धवस्त झाली. त्यामुळे या कुटुंबीयांच्या जीवनात अंधःकार पसरला होता. गेली दोन वर्षे ही उध्वस्त कुटुंबे तिवरेतच कंटेनरमध्ये राहत होती. आज दोन वर्षांनंतर या धरणग्रस्तांच्या जीवनात आनंदाची नवी पहाट उगवली आहे.

अलोरे येथे धरणग्रतांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. कंटेनरमध्ये राहणाऱ्या दहा कुटुंबांना प्रथम प्राधान्य देत पहिल्या 10 घरांचा ताबा आज या धरणस्तांना देण्यात आला. दोन वर्षे कंटेनरमध्ये राहिल्यानंतर दहा कुटुंबांनी आज आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन कळ दाबून या घरांचे लोकार्पण करण्यात आले. चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयात हा ऑनलाइन लोकार्पण सोहळा पार पडला.

तिवरे धरणफुटी बाधितांना मिळाला हक्काचा निवारा

उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी सात कोटींचा निधी - मुख्यमंत्री

तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, तर पालकमंत्री अ‌ॅड. अनिल परब, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाइन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष घरांच्या ठिकाणी देखील उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबीयांविषयी मनात सहवेदना आहे तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे, असे म्हणता येईल. मी हे दान करणाऱ्या भाविकांना आणि मंदिर न्यासाला त्यांच्या या मदतीसाठी धन्यवाद देतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही यावेळी आवर्जुन उल्लेख केला.

तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडू नयेत याची काळजी घेण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित व अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सुचना आपण दिल्या आहेत. वित्त हानी भरून काढता येते परंतु मनुष्य हानी न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तिवरे धरणफुटीच्या घटनेत तब्बल 54 कुटुंबे बाधित झाली. या कुटुबांसाठी अलोरे येथे पुनर्वसनाअंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 24 घरे उभारली असून त्यातील काही घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. 2 वर्षे कंटेनरमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना प्राधान्याने घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज पहिली सोडत काढण्यात आली.

धरणग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी एकप्रकारे सिद्धीविनायकच धावून आला आहे. पुनर्वसन प्रकल्पाला 11 कोटीचा निधी सिद्धीविनायक ट्रस्टने मंजूर केला.
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एकूण 54 घरांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी 11 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता, त्यापैकी 5 कोटी रुपये सिद्धीविनायक ट्रस्टने दिले. उर्वरित निधीही सिद्धीविनायककडून देण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या 24 घरांचा पहिला पुनर्वसन प्रकल्प अलोर येथे उभारण्यात आला आहे. अत्यंत टुमदार आणि देखणी हवेशीर अशी सिद्धीविनायक नगरी येथे उभी करण्यात आली आहे. या कामाबाबत धरणग्रस्तांनी समाधान व्यक्त केलं असून उर्वरित धरणग्रस्तांची घरेही लवकरच पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा लोकांकडून केली जात आहे.

दोन वर्षांपूर्वी घडली दुर्घटना -

2 जुलै 2019 च्या अमावस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आणि धरणानजीक वसलेल्या भेंदवाडीचे होत्याचं नव्हतं झालं. भेंदवाडीतील 22 घरे , जनावरांचे गोठे आणि 22 जण या पाण्याच्या लोंढयात वाहून गेले होते. या दुर्घटनेत त्यावेळी एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. 22 पैकी 21 मृतदेह सापडले, मात्र तेव्हा दीड वर्षांची असणारी दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान मृतदेह सापडलेल्या 21 पैकी 19 जणांच्या वारसांना शासनाकडून धनादेश वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून दोन लाख तर राज्याच्या नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून चार लाख व सरकारकडून 6 लाखांची मदत देण्यात आली.

पुनर्वसन प्रश्न -

या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या एकूण 56 कुटुंबांचे पुनर्वसन कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. दरम्यान कुटुंबांच्या पुनवर्सनासाठी शासनाच्या अलोरे आणि नागावे येथील असलेल्या जागेवर 24 घरे बांधण्यात आली आहेत. तर काही कुटुंबियांना तिवरे गावामध्येच पुनवर्सन हवं आहे. त्यांच्या मागणीचा सध्या विचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.