ETV Bharat / state

लांजातील घनकचरा प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलं; प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लांजा नगरपंचायत 10 एकरात घनकचरा प्रकल्प राबवत आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे दादही मागण्यात आली. मात्र प्रशासन आपली बाजू समजून घेण्याऐवजी प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

लांजा घनकचरा
लांजा घनकचरा
author img

By

Published : Jun 6, 2021, 1:15 PM IST

Updated : Jun 6, 2021, 2:18 PM IST

रत्नागिरी - लांजा कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलं असून या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनही आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी आपलं गाऱ्हाणं थेट खासदार विनायक राऊत यांच्याकडे मांडलं आहे. कोत्रेवाडी येथे बेकायदेशीरपणे होत असलेल्या या डंपिग ग्राउंड प्रकल्पाची सखोल चौकशी करून तो रद्द करण्यात यावा, यासाठी लांजा नगरपंचायतीचे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक प्रसाद डोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांची लांजा येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं.

लांजातील घनकचरा प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलं
खासदार आम्हाला न्याय देतील लांजा नगरपंचायत 10 एकरात घनकचरा प्रकल्प राबवत आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे दादही मागण्यात आली. मात्र प्रशासन आपली बाजू समजून घेण्याऐवजी प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर स्थानिकांनी आपलं गाऱ्हाणं खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मांडलं आहे. खासदार विनायक राऊत आम्हाला न्याय देतील, अशी आशा आम्हाला असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊ दरम्यान या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे, याबाबत आपल्याला स्थानिकांनी निवेदन दिलं आहे. याची आम्ही गांभीर्याने दखल घेऊ. तसेच संबंधित जागेवर भेट देऊ आणि प्रकल्प राबवत असताना सर्वांना विश्वासात घेतलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. निवेदनात काय म्हटलं आहे ? या निवेदनात म्हटले आहे, की लांजा नगरपंचायतमार्फत प्रकल्पासाठी एप्रिल २०२१ रोजी जाहिरात निदर्शनास आली. ही जाहिरात पूर्णपणे बेकायदेशीर आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. कारण जाहिरातीत नमूद गट नंबरच्या जागेबाबतचा विशिष्ट असा कोणताही ठराव लांजा नगरपंचायतमध्ये झालेला नाही. तसेच अशा प्रकारचा धोरणात्मक व आर्थिक विषयासंदर्भात महत्त्वाचा ठराव ठरत असताना हा विषय मिटिंगच्या अजेंड्यावर असणे अपेक्षित आहे. इतका महत्त्वाचा विषय अजेंड्यावर घेता व स्थानिक नगरसेवक हजर नसताना सत्ताधारी गटाने स्थानिक नगरसेवकांच्या अनुपस्थितीत तीन जागांचा एकत्र एकच ठराव करून तो एकाच जागेचा आहे, असे भासवत ही जाहिरात काढली आहे. या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत तसेच या प्रस्तावित जागेतील डंपिंग ग्राउंडला स्थानिकांचा विरोध आहे. प्रकल्पाच्या जागेला लगत एक मोठी विहीर असून तिच्यावर ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत जागेला लागून ओढा वाहतो जागेपासून अगदी १०० मीटरवर नागरी वस्ती आहे. या सर्व गोष्टी गंभीर असून स्थानिकांच्या आरोग्याला घातक आहेत . पाणी दूषित होऊन रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. रोगांसाठी निमंत्रण ठरत आहे प्रकल्पापासून अवघ्या शंभर दीडशे मीटर अंतरावर नागरी वस्ती आहे . त्या नागरिकांना प्रकल्प जवळपास रोगांसाठी निमंत्रण ठरत आहे. तरीही अशाप्रकारे स्थानिकांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पाळता हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न चालू असल्याचंही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान हा प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Last Updated : Jun 6, 2021, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.