ETV Bharat / state

नौका खडकावर आदळल्याने दहा लाखांचे नुकसान, दहा खलाशांना वाचवण्यात यश

गणपतीपुळे समुद्रकिनारी ‘निसणघाटी’ या ठिकाणी साखरतर येथील मच्छिमारी नौका गुरुवारी पहाटेच्या सुमारास खडकावर आदळली. यात बोटीचे दहा लाखांचे नुकसान झाले असून दहा खलाशांना वाचविण्यात यश आले आहे.

अपघातग्रस्त नौका
author img

By

Published : Sep 19, 2019, 9:18 PM IST

रत्नागिरी - गणपतीपुळे समुद्रकिनारी ‘निसणघाटी’ या ठिकाणी साखरतर येथील मच्छिमारी नौका गुरुवारी पहाटेच्या सुमारास खडकावर आदळली. बोटीच्या पंख्यामध्ये मासेमारी जाळे अडकल्याने नौका समुद्रातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने नौकेला भलेमोठे भगदाड पडले. बोटीतील खलाशांनी प्रसंगावधान राखत नौका किनाऱ्यापर्यंत आणली. परंतु, या दुर्घटनेत नौकेचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

नौका खडकावर आदळल्याने दहा लाखांचे नुकसान

साखरतर येथे राहणाऱ्या मेहताब साखरकर यांच्या मालकीची ही नौका होती. अलीलक्ष्मी असे या नौकेचे नाव आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास साखरकर यांची नौका मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. दरम्यान, समुद्रात सोडलेले जाळे ओढत असताना हे जाळे बोटीच्या पंख्यामध्ये अडकल्याने बोट अचानक बंद पडली. अलीलक्ष्मी या नौकेचे इंजिन बंद पडल्याने ही नौका लाटांच्या तडाख्यात सापडली. लाटांच्या तडाख्याने नौका खडकावर जाऊन आदळली. यामुळे नौकेला भगदाड पडल्याने एकच गोंधळ उडाला. या बोटीवर दहा खलाशी होते. प्रसंगावधान राखत खलाशांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नौका किनाऱ्यापर्यंत आणली. गणपतीपुळे येथील निसणघाटी येथे समुद्रकिनारी नौका उभी करण्यात आली.

खडकावर बोट आदळल्याने बोटीच्या मध्यभागी भगदाड पडले असून बोटीला चिर गेली आहे. बोट फुटल्याने बोटीतील पकडलेली सर्व मासळी वाहून गेली. बोटीवरील दहा खलाशी सुखरूप किनाऱ्यावर परतल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर बोटीवरील जाळी काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दुर्घटनाग्रस्त नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी गणपतीपुळे, भंडारपुळे येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांनी मदतकार्य केले.

या घटनेची खबर तत्काळ जयगड पोलीस आणि मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच जयगड पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळाला भेट दिली.

Intro: मासेमारी नौका खडकावर आदळल्याने दहा लाखांचे नुकसान

गणपतीपुळे समुद्रातील घटना

दहा खलाशांना वाचवण्यात यश

रत्नागिरी, प्रतिनिधी

गणपतीपुळे समुद्रकिनारी ‘निसणघाटी’ या ठिकाणी साखरतर येथील मच्छिमारी नौका गुरुवारी पहाटेच्या सुमारास खडकावर आदळली. बोटीच्या पंख्यामध्ये मासेमारी जाळे अडकल्याने नौका समुद्रातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने नौकेला भलेमोठे भगदाड पडले. बोटीतील खलाशांनी प्रसंगावधान राखत नौका किना-यापर्यंत आणली. परंतु, या दुर्घटनेत नौकेचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
साखरतर येथे राहणा-या मेहताब साखरकर यांच्या मालकीची ही नौका होती.. अलीलक्ष्मी असं या नौकेचं नाव आहे.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास साखरकर यांची नौका मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. दरम्यान समुद्रात सोडलेले जाळे ओढत असताना हे जाळे बोटीच्या पंख्यामध्ये अडकल्याने बोट अचानक बंद पडली. अलीलक्ष्मी या नौकेचे इंजिन बंद पडल्याने ही नौका लाटांच्या तडाख्यात सापडली. लाटांच्या तडाख्याने नौका खडकावर जाऊन आदळली आणि फुटली. नौका फुटल्याने एकच गोंधळ उडाला. या बोटीवर दहा खलाशी होते. प्रसंगावधान राखत खलाशांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नौका किना-यापर्यंत आणली. गणपतीपुळे येथील निसणघाटी येथे समुद्रकिनारी नौका उभी करण्यात आली.
खडकावर आदळून बोट आदळल्याने बोटीच्या मध्यभागी भगदाड पडले असून बोटीला चिर गेली आहे. बोट फुटल्याने बोटीतील पकडलेली सर्व मासळी वाहून गेली. बोटीवरील दहा खलाशी सुखरूप किना-यावर परतल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर बोटीवरील जाळी काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दुर्घटनाग्रस्त नौका किना-यावर आणण्यासाठी गणपतीपुळे, भंडारपुळे येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांनी मदतकार्य केले.
या दुर्घटनेची खबर तत्काळ जयगड पोलीस आणि मत्स्य खात्याच्या अधिका-यांना देण्यात आली. मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच जयगड पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. Body:मासेमारी नौका खडकावर आदळल्याने दहा लाखांचे नुकसान

गणपतीपुळे समुद्रातील घटना

दहा खलाशांना वाचवण्यात यशConclusion:मासेमारी नौका खडकावर आदळल्याने दहा लाखांचे नुकसान

गणपतीपुळे समुद्रातील घटना

दहा खलाशांना वाचवण्यात यश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.