रत्नागिरी - शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘नगराध्यक्ष, रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार? असा सवाल उपस्थित करत, शहर भाजपच्या वतीने आठवडा बाजार परिसर आणि गांधी कॉलनी येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भाजपाच्या या गांधीगिरी आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू आहे.
दरम्यान शहराती अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने यावेळी करण्यात आला. रस्ते आठ दिवसांच्या आत दुरूस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला. तर गेली काही वर्ष शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. एकदा केलेल्या कामानंतर रस्त्यांवर पुन्हा डांबर टाकावे लागते, एकदा केलेला रस्ता किती वर्षे टिकला पाहिजे याबाबतही नियम, निकष आहेत. परंतु सत्ताधार्यांकडून रस्त्यांच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. असं भाजपयुमोेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी म्हटले आहे. या वेळी विनय मलुष्टे, संदीप सुर्वे, नगरसेवक राजेश तोडणकर, राजन पटवर्धन, राजश्री शिवलकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, राजन फाळके, संदीप रसाळ, यांची उपस्थिती होती.