रत्नागिरी - पुण्यामध्ये आमदार उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध आज रत्नागिरीत करण्यात ( Protest against Uday Samant attack in Pune ) आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. सामंत यांच्याबाबत असा विचार कोणी करत असेल त्यांना ईट का जवाब पत्थर से देऊ, असा इशारा तुषार साळवी यांनी दिला आहे. रत्नागिरीतील युवा नेतृत्त्व तुषार साळवी हे उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीतील शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत आम्ही सामंतांबरोबर असल्याचे ठणकावून सांगणारे म्हणून साळवी यांची ओळख आहे.
पुण्यातील हल्ल्याचा निषेध - पुण्यातील प्रकाराचे पडसाद आज रत्नागिरीत उमटले. शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून या घटनेचा निषेध सामंत समर्थकांकडून करण्यात आला. तसेच सकाळी 11 वाजता वाजता मोठ्या संख्येने उदय सामंत यांचे समर्थक सामंत यांच्या कार्यालयाबाहेर जमले आणि या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
हेही वाचा - Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा; 'शांत बसाव अन्यथा शिवसैनिक...'
समर्थकांचा इशारा - हल्ला करणार्यांविरोधात कार्यालयाबाहेर समर्थकांनी जाहीर निषेध नोंदवीला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना साळवी म्हणाले, आमदार सामंत हे रत्नागिरीचाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. शांत, सयंमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अशा व्यक्तीच्या विरोधात असला भ्याड पणा कोणी करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. राजकारणामध्ये कार्यरत सामंत यांनी आतापर्यंत वैचारीक पातळी कधीच सोडलेली नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीविरोधात जाणूनबुजून कोणी षडयंत्र रचत असतील तर ते कदापी सहन करणार नाही. हल्लेखोरांनी लक्षात ठेवले पाहीजे की तुमच्या घरात शिरुन फटके देण्याची आमच्यामध्येही धमक आहे.
पोलीस प्रशासनाला विनंती करताना ते म्हणाले, सामंत यांच्यावर हल्ला करणार्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहीजे. जेणेकरुन भविष्यात असली भ्याड कृत्य त्यांच्या हातून होणार नाहीत. यावेळी बिपीन बंदरकर, राजन शेट्ये, कांचन नागवेकर, स्मितल पावसकर, पिंट्या साळवी, निमेश नायर, गजानन तथा आबा पाटील, अल्ताफ संगमेश्वरी, रमजान गोलंदाज, अजीम चिकटे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - Uday Samant Attack : भगवे मफलर घालून राष्ट्रवादीकडून उदय सामंतांवर हल्ला - गोपीचंद पडळकर