ETV Bharat / state

रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून दिला घराबाहेर न पडण्याचा संदेश

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका असे प्रशासन आणि शासन वारंवार सांगत आहे, मात्र लोक ऐकत नाहीत. रत्नागिरीतील चित्रकलेची आवड असणाऱ्या प्राध्यापक स्वप्नजा मोहिते यांनी चित्रांच्या माध्यमातून घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला आहे.

Pictures
चित्र
author img

By

Published : Apr 11, 2020, 1:12 PM IST

रत्नागिरी - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडताना दिसतात. विनाकारण घराबाहेर पडू नका असे प्रशासन आणि शासन वारंवार सांगत आहे, मात्र लोक ऐकत नाहीत. रत्नागिरीतील चित्रकलेची आवड असणाऱ्या प्राध्यापक स्वप्नजा मोहिते यांनी चित्रांच्या माध्यमातून घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला आहे.

चित्रांच्या माध्यमातून दिला घराबाहेर न पडण्याचा संदेश

स्वप्नजा मोहिते यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांमध्ये घराबाहेर पडलात तर किती धोका आहे, हे सांगितलं आहे. तुमची पावले लक्ष्मण रेषेच्या आतच असावीत, ही लक्ष्मण रेषा ओलांडता कामा नये. नाहीतर बाहेर मोठ संकट आहे, तुम्ही घरी सुरक्षित आहात, हेच या चित्रांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्ना केला आहे. या चित्रांची त्यांनी शॉर्टफिल्म बनवली असून त्या माध्यमातून त्यांनी लोकांना सुरक्षेचा संदेश दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.