रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुन्हा 600 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार मागील 24 तासांत जिल्ह्यात 627 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज 23 मृत्यूंची नोंद झाली. तर, जिल्ह्यात सध्या उपचाराखाली असणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 593 एवढी आहे.
हेही वाचा - धान्य वाहतूक करणारा ट्रक डोंगरावर आदळला, चालकाचा जागीच मृत्यू
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 203 पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. आज आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 627 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 404 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले, तर 223 रुग्ण अँटिजेन चाचणी केलेले आहेत. 627 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 हजार 849 झाली आहे.
आज सापडलेल्या 627 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात 203, दापोली 43, खेड 25, गुहागर 66, चिपळूण 146, संगमेश्वर 68, मंडणगड 3, राजापूर 49 आणि लांजा तालुक्यात 24 रुग्ण सापडले आहेत.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या काही दिवसांत 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे, आज 23 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.96 टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे.
हेही वाचा - कामथेतील डॉक्टरला मारहाण करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक