रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या १७२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बस डेपोमधून रोज ४५०० बस धावतात. एसटीच्या जवळपास ३५ टक्के फेऱ्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. मुंबई आणि पुण्याच्या एसटी बसे सेवेचा यात समावेश आहे.
दहावींच्या मुलांसाठी लागणाऱ्या एसटी बस आज मात्र रद्दतून वगळल्या गेल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना आणि प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे एसटी प्रशासनाने एसटीच्या बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभूमीवर एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये चढतानाच हातावर सॅनिटायझर देण्यात येत आहे.