खालापूर (रायगड) - दिवसेंदिवस पाताळगंगा नदीत जलपर्णी ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यांचाच फटका मासे पकडणा-या स्थानिक मच्छीमारी करणाऱ्या यांना बसला आहे. ज्या ठिकाणी जलपर्णी आहेत, त्या ठिकाणी जाळे पसरु शकत नाही. शिवाय हिची वाढ अतिशय जलद असल्यामुळे काही दिवसात ही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे.
नदीत जलपर्णी दिवसेंदिवस वाढू लागली
सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे काही दिवसात नदीला पूर आल्यास ही सर्व जलपर्णी वाहून जाते. मात्र तो पर्यंत ही जलपर्णी किती जाळे पसरेल यांचा काही नेम नाही.
जलपर्णीमुळे मासेमारी धोक्यात
दिवसेंदिवस पाताळगंगा या नदीची अवस्था बिकट होत चालली असताना, मात्र याकडे सातत्यांने दुर्लक्ष करण्यात येत आसल्यामुळे नकळत आपल्या कारखान्यातील पाणी नदीच्या पात्रात सोडून देत असतात. याचाच फटका जलचर प्राणी यांना बसत असल्यामुळे माशांची वाढ कमी होत आहे. त्याच बरोबर मासे मृत होत असल्यांचे स्थानिक मच्छिमारी करणारे नागरीक यांच्याकडून बोलले जात आहे.
विजेची निर्मिती झाल्यावर टाटा पावर हाऊसचे पाणी या पाताळगंगा नदीला सोडले जाते. सोडलेले पाणी गगनगिरी महाराज यांच्या मठाजवळ पाणी शुद्ध असते, परंतु हे पाणी जसे गगनगिरी महाराज यांच्या मठातून बाहेर पडते त्याच्या थोडयाच अंतरावर औद्योगिक कारखाने वसले आहे. त्यामुळे खोपोली पासून ते आपटा पर्यंत या नदीची अवस्था एकदम बिकट होत चालली आहे. पूर्वी या नदीमधून भरपूर मासे मिळत असे, शिवाय कुटुंबांचा उदरनिर्वाह या माश्यांच्या विक्रीने होत होता. मात्र जलपर्णी असे दुहेरी संकट सध्या स्थानिक मच्छीमारी यांच्या समोर निर्माण झाले आहे.