रायगड - जिल्ह्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने सुमारे 50 टन टाकाऊ प्लास्टिकपासून 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवला आहे. गेल्या वर्षी बांधण्यात आलेल्या रस्त्यावर अडीच हजार मिमी पाऊस पडूनही, रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही. त्यामुळे याच धर्तीवर शासनाने देखील प्लास्टिकचा रस्ता बांधण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
हेही वााचा... माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'
प्लास्टिक हे पर्यावरणाला घातक आहे. त्याचा फटका हा नागरिकांना तसेच प्राण्यांनाही बसताना आपण नेहमी पाहत असतो. त्याच बरोबर ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा डम्पिंग मैदानावर पसरलेला असतो. त्यामुळे सामान्यांना दुर्गंधीचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एक पाऊल पुढे जात, ग्राहकांनी वापरलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ता बांधण्यात केला. कंपनीने कंपनीच्या अंतर्गत 40 किमी लांबीचा रस्ता बनवला. हा रस्ता प्रायोगिक तत्वावर तयार केला आहे. त्याचा प्रयोग यशस्वी झाला असून शासनाने या प्लास्टिक रस्त्याचे अनुकरण करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे, रिलायन्स पेट्रोकेमिकल बिझिनेसचे सीईओ विपुल शहा यांनी सांगितले.
हेही वाचा.... 'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'
प्लास्टिकचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. मानवाला लागणारे प्रत्येक खाद्यपदार्थ, चैनीच्या वस्तू, कॉस्मेटिक यांमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. मात्र त्या वस्तू वापरून झाल्यानंतर प्लास्टिक हे कचऱ्यात फेकून दिले जाते. कचऱ्यात टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, या जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांनाही त्रास होतो. तसेच वातावरणालाही प्लास्टिकमुळे हानी पोहचत असते.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती
नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या परिसरातील 40 किमी लांबीचे रस्ते 50 टन टाकाऊ प्लास्टिक वापरून तयार करण्यात आलेले आहेत. मे 2019 रोजी रस्त्याच्या बांधकामास सुरुवात करून दोन महिन्यात पूर्ण केले. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले. मात्र, नागोठणे येथे अडीच हजार मिमी पाऊस पडूनही कंपनीत प्लास्टिक पासून बनविलेला रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही. डांबरीपासून बनवलेल्या रस्त्यापेक्षा टाकाऊ प्लास्टिकपासून बनविलेल्या एक किलोमीटर रस्त्याच्या खर्चात एक लाखांची बचत होते, असे शहा यांनी सांगितले.