ETV Bharat / state

रायगड; अन् जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचेच आरोग्य आले धोक्यात

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात डॉक्टरांना राहण्यासाठी तळमजलासह तीन मजल्याची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत १६ खोल्या असून सध्या १५ डॉक्टर आपल्या कुटूंबासह वास्तव्य करीत आहेत. इमारतीत राहण्यासाठी डॉक्टर यांच्या वेतनातून एचआरएसुद्धा कापला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे येथील डॉक्टर आता शहरात भाड्याचे घर शोधत आहेत.

author img

By

Published : Mar 13, 2021, 5:12 PM IST

जिल्हा सामान्य रुग्णालय
जिल्हा सामान्य रुग्णालय

रायगड - रुग्णांवर त्वरित उपचार मिळावे यासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात डॉक्टर वसाहत बांधण्यात आली आहे. या वसाहतीत कुटूंबासह डॉक्टर राहत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वसाहत परिसर हा अस्वछता आणि समस्येच्या गर्तेत सापडला आहे. एकीकडे कोरोनासारख्या महामारीत डॉक्टर दिवसरात्र रुग्णांना बरे करण्यासाठी सेवा बजावत आहेत. मात्र, वास्तव्य करीत असलेल्या परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय स्वच्छता ठेकेदार याचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे सामराज्य

रुग्णालय परिसरात डॉक्टराची तीन मजली इमारतजिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात डॉक्टरांना राहण्यासाठी तळमजलासह तीन मजल्याची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत १६ खोल्या असून सध्या १५ डॉक्टर आपल्या कुटूंबासह वास्तव्य करीत आहेत. इमारतीत राहण्यासाठी डॉक्टर यांच्या वेतनातून एचआरएसुद्धा कापला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे येथील डॉक्टर आता शहरात भाड्याचे घर शोधत आहेत. कोरोना काळात डॉक्टरांना घर मिळणेही कठीण झाले आहे.
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे सामराज्यरायगड जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे सामराज्य

अस्वच्छता आणि दुर्गंधीने इमारत परिसर ग्रासलेलाइमारतीचा चारी बाजूचा परिसर हा झाडाझुडपाने व्यापला आहे. तर ड्रेनेज सुविधाही कोलमडली आहे. ड्रेनेज टाक्याच्यावर झाकण नसल्याने एखादे लहान मूल टाक्यांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. इमारतीमधील शौचालयाचे पाईक लीक झाले असून सर्व घाण डॉक्टरांच्या शौचालयात पडत आहे. त्यामुळे घरातही दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या शौचालययाच्या खिडक्या बंद करून घेतल्या आहेत. परिसरात गटाराचे पाणी साचले असून त्यामुळे डासही निर्माण झाले आहेत. परिसरात बंद पडलेली वाहनेही ठेवली असून ती गंजली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांचे दुर्लक्षइमारतीत राहण्यासाठी डॉक्टरांच्या वेतनातून भाड्यापोटी पैसे कपात होत आहेत. मात्र, इमारतीच्या नादुरुस्त पाईप, लिकेज याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे केली जात नाही. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून ठेकेदार नेमण्यात आला आहे. मात्र ठेकेदारकडूनही इमारत परिसर स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. डॉक्टरांच्या इमारती परिसरात अस्वच्छता पसरली असल्याने आता त्याचेच आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी डॉक्टरकडून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.