ETV Bharat / state

Gharapuri Gram Panchayat: घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध; उद्धव ठाकरे सेनेचा भगवा फडकला

Gharapuri Gram Panchayat: उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुक होत आहे. त्यातील घारापुरी ग्रामपंचायतमधील ७ जागा व सरपंच पद असे एकूण ८ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

Gharapuri Gram Panchayat
Gharapuri Gram Panchayat
author img

By

Published : Dec 3, 2022, 9:47 AM IST

रायगड: उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुक होत आहे. त्यातील घारापुरी ग्रामपंचायतमधील Gram Panchayat Elections७ जागा व सरपंच पद असे एकूण ८ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध Gram Panchayat Elections झाली आहे. माजी सरपंच बळीराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी भाजपचे असतानाही घारापुरी ग्रामपंचायतमध्ये भाजपाला एकही उमेदवार मिळू शकला नाही.

राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे सेनेला शुभसंकेत: उरणमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध करून विजयी खाते उघडल्याने शिवसेनेसाठी पायगुण चांगला असून हा मेसेज राज्यात जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा अभिनंदन करताना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी प्रतिपादन केले. तसेच माजी सरपंच बळीराम ठाकूर व त्यांच्या टीमने केलेल्या विकास कामामुळेच विरोधकांना उमेदवार सापडले नाहीत. त्यामुळे घारापुरी हे जागतिक कीर्तीचे बेट असल्याने हा विजय शिवसेनेला तालुक्यात नव्हे, तर राज्यात उभारी देणारे ठरेल असा विश्वास शिवसैनिक दाखवत आहेत.

निवडणूक बिनविरोध झाली: घारापुरी ग्रामपंचायत मधील सदस्यांसाठी ७ जागांसाठी ७ तर सरपंच पदासाठी १ असे एकूण ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. घारापुरी ग्रामपंचायतमध्ये विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर बिनविरोध झालेल्या या निवड प्रक्रियेनंतर आता राज्यांतल्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला शुभसंकेत मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.

सेनेने केलेल्या कामंवर शिक्कामोर्तब केल्याची प्रतिक्रिया: घारापुरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून एकप्रकारे आम्ही केलेल्या विकास कामांवर शिक्कामोर्तब केला असल्याचे माजी सरपंच बळीराम ठाकूर यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सांगितले. ग्रामपंचायत घारापुरी सार्वत्रिक निवडणूक २०२२ थेट सरपंच उमेदवार महिला आरक्षण मीना मुकेश भोईर, प्रभाग क्रमांक १- बळीराम पद्माकर ठाकुर, हेमाली रुपेश म्हात्रे, अरुणा कमलाकर घरत, प्रभाग क्रमांक २- भरत शंकर पाटील. सर्वसाधारण, नीता दिनेश ठाकुर, प्रभाग क्रमांक ३- सचिन मुकुंद लाड. सर्वसाधारण, भारती प्रमोद पांचाळ असे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे बिनविरोध निवडून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.