ETV Bharat / state

Accident At Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला ( Accident At Mumbai Goa Highway) आहे. आयशर टेम्पोने धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला ( Two Persone Death Accident At Rajapur ) आहे.

Accident At Mumbai Goa Highway
Accident At Mumbai Goa Highway
author img

By

Published : Apr 1, 2022, 5:47 PM IST

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूरमध्ये भीषण अपघात झाला ( Accident At Mumbai Goa Highway) आहे. गोव्याकडून भरघाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला ( Two Persone Death Accident At Rajapur ) आहे. बाजीराव डोंगळे ( वय 52, रा. हातिवले ) आणि विजय हरेश्वर शिंदे ( वय 45, रा. खडपेवाडी, राजापूर ) अशी अपघातात मृत्यू पडलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकीवरून हातिवले येथून गुरुवारी राजापूरला येत होते. हे दुचाकीस्वार हे कुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता दुचाकीच्या पुढे असलेल्या कंटेनरची साईट घेऊन पुढे येण्याच्या प्रयत्न केला. तेवढ्यात गोवा दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या चाकाखाली जाऊन सुमारे १०० ते १२० फुट फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही टेम्पोच्या चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.

दुचाकीला धडक दिल्यानंतर या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही या टेम्पोने धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र, यामध्ये एसटीचे नुकसान झाले आहे. सदरचा आयशर टेम्पो सिंधुदुगार्तून खेड येथे जात होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थली धाव घेतली. त्यानंतर या अपघाताला कारणीभुत असलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रशासनामुळे दोघांचा बळी - या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ठेकेदार आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे दोघांचा हकनाम बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा - Gas Price Rises : सांगलीत गॅस दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन; कृष्णामाईला सिलिंडर केला अर्पण

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.