रायगड - भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन आपण उत्साहात साजरा करणार आहोत. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. देशात लोकशाहीचे नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा - नवी मुंबईकरांना सुखद धक्का; '2025 पर्यंत करवाढ नाही'
याच दिवसाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यलयाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई नवी मुंबईकरांचे मन मोहून घेत आहे.