ETV Bharat / state

कळंबोलीतील 'तो' टाईम बॉम्ब निकामी, अनर्थ टळला - बॉम्ब निकामी

सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला आहे.

कळंबोलीतील 'तो' टाईम बॉम्ब निकामी, अनर्थ टळला
author img

By

Published : Jun 17, 2019, 9:24 PM IST

Updated : Jun 17, 2019, 9:34 PM IST

पनवेल - शाळेचा पहिला दिवस पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुतुहलचा दिवस ठरतो. मात्र, पनवेलच्या कळंबोलीत सुधागड हायस्कुलच्या समोरील मैदानात बॉम्ब आढळून आल्याने पनवेल शहरात एकच खळबळ माजली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका हातगाडीवर टायम लावलेला बॉम्ब आढल्यानंतर कळंबोली पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. ही संशयित वस्तू बॉम्बच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला आहे.

कळंबोलीतील 'तो' टाईम बॉम्ब निकामी, अनर्थ टळला

सुधागड शाळेच्या समोर असलेल्या स्मृती पार्कमध्ये उभ्या असलेल्या एका हातगाडीवर एका बॉक्समध्ये लाल रंगाचा डब्बा ठेवण्यात आला होता. या डब्बात एक बॅटरी होती आणि ती एका घड्याळासोबत जोडली होती. हे पाहून तिथल्याच एका सुरक्षारक्षकाने ही माहिती कळंबोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कळंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.

तपासणीमध्ये या बॅगेत स्फोटक पदार्थ असल्याचे पथकाला आढळले. त्यानंतर सुमारे 5 तासांच्या प्रयत्नांनंतर हा बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोणी तरी हा बॉक्स येथे हातगाडीवर आणून ठेवला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

बॉम्ब स्कॉडकडून हा बॉम्ब निकामी करण्यात आला आहे. हा टाईम बॉम्ब वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, कळंबोलीत टाईम बॉम्ब सापडल्याने तपास यंत्रणांना सतर्क झाल्या आहेत. आता हा बॉम्ब कोणी आणि कशासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Intro:बातमीला आधी व्हिडिओ पाठवले आहेत, आता बाईट सोबत जोडली आहे.

पनवेल

पनवेलच्या कळंबोलीत सुधागड हायस्कुलच्या समोरील मैदानात बॉम्ब आढळून आल्याने पनवेल शहरात एकच खळबळ माजली होती.सायंकाळी साडेचार च्या सुमारास एका हातगाडीवर टायमर लावलेला बॉम्ब आढल्यानंतर कळंबोली पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. ही संशयित वस्तू बॉम्बच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला आहे. Body:उरणमध्ये खोपटे खाडी पुलावरील खांबावर संशयास्पद दहशतवादाशी निगडित मजकूर आणि चित्रे, त्यांनतर सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच आज कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. सुधागड शाळेच्या समोर असलेल्या स्मृती पार्कमध्ये उभ्या असलेल्या एका हातगाडीवर

एका बॉक्समध्ये लाल रंगाचा डब्बा ठेवला होता. या डब्बात एक बॅटरी होती आणि ती एका घड्याळासोबत जोडलेली पाहून तिथल्याच एका सुरक्षारक्षकाने ताबडतोब ही माहिती कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार कळंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणीत या बॅगेत स्फोटक पदार्थ असल्याचे पथकाला आढळले. पुढे सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर हा बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश आलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोणी तरी हा बॉक्स इथे हातगाडीवर आणून ठेवला होता, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. Conclusion:
बॉम्ब स्कॉड कडून बॉम्ब निकामी करण्यात आलाय. हा टाईम बॉम्ब वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान, कळंबोलीत टाईम बॉम्ब सापडल्याने तपास यंत्रणांना सतर्क झाल्यात. आता हा बॉम्ब कोणी आणि कशासाठी आणला होता याचा पोलिस तपास करतायेत.
Last Updated : Jun 17, 2019, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.