रायगड (खोपोली) - खोपोलीतील सहजसेवा फाउंडेशन ही समाजाप्रती जागरूक आलेली सामाजिक संस्था आहे. समाजकार्यातून प्रभावी संदेश देणारे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. मनापासून वेळ देणारे सहकारी येथे असल्याने या वर्षभरात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात संस्था वेगाने वाढत आहे. अशी माहिती सहजसेवा फाउंडेशनच्या पुणे जिल्हाध्यक्ष आरती सोनाग्रा यांनी दिली आहे.
'महाराष्ट्रातील विविध शाखांच्या माध्यमातून जवळपास 12000 वृक्षांना बांधल्या राख्या'
कोरोनामुळे सर्व जगाला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजनचे महत्त्व लक्षात आले आहे. वृक्ष हे आपले कुटुंबातील एक घटकच आहे. वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत नात्यांची वीण घट्ट केली आहे. त्यासोबतच त्यांचा आदर करून त्यांची गरज ओळखत त्यांच्याशी नवे नाते जोडले पाहिजे. वृक्षतोड कशी थांबेल व वृक्षवाढ कशी झपाट्याने होईल याचा प्रसार करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशन प्रयत्न करते. या संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाखांच्या माध्यमातून जवळपास 12000 वृक्षांना रविवार 22 ऑगस्ट रोजी अर्थातच रक्षाबंधनच्या दिवशी झाडांना राखी बांधून वृक्षावर असणाऱ्या प्रेमाचे नाते दृढ करून समाजास आगळावेगळा संदेश दिला आहे.
'महाराष्ट्रातून या उपक्रम चांगला प्रतिसाद'
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा श्रीमती माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी.निरंजन व जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, आयुब खान, बंटी कांबळे, आफताब सय्यद, उपक्रम प्रमुख ॲड.आरती सोनाग्रा यांनी परिश्रम घेतले असून संपुर्ण राज्यातून या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे.
'निसर्गाचा प्रति समाजात आदराची भावना'
निसर्गाप्रति समाजात आदरयुक्त भावना निर्माण होण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध निसर्गपुरक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन उपक्रम प्रमुख ॲड.आरती सोनाग्रा यांनी केले आहे.
'खोपोलीतील सहजसेवा फाउंडेशनचा आगळावेगळा उपक्रम'
निसर्ग चळवळीत आवड असेल त्यांनी नक्कीच सामील व्हा या आवाहनाला साथ देऊन संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागासाठी मुंबई शहरातून कल्याणी आपटे, मुंबई उपनगर येथून डॉ.अलका नाईक, ठाणे जिल्ह्यातून सीमा घिजे, रायगड जिल्ह्यातून जयश्री गावंड, रत्नागिरी जिल्ह्यातून दीक्षा माने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्वाती पाटील, नाशिक जिल्ह्यातील कविता जाधव, भाग्यश्री महाजन, धुळे जिल्ह्यातून रसिका दोशी, नंदूरबार जिल्ह्यातून सुनीता शाह, जळगाव जिल्ह्यातून स्मिता भिवसने, अहमदनगर जिल्ह्यातून अर्चना तांबे, पुणे जिल्ह्यासाठी माधुरी गुजराथी, ॲड. आरती सोनाग्रा, सातारा जिल्ह्यातून प्रियांका जाधव, सांगली जिल्ह्यातून प्रतिभा पाटील, कोल्हापूर जिल्ह्यातून पद्मिनी माने, सोलापूर जिल्ह्यातून जयश्री पाटील, तर औरंगाबाद जिल्ह्यातून उज्वला शिंदे, हिंगोली जिल्ह्यातून सुनंदा वाघमारे, बीड जिल्ह्यातून अर्चना सानप, नांदेड जिल्ह्यातून विजया कोचा, उस्मानाबाद जिल्ह्यातून उज्जवला कांबळे, लातूर जिल्ह्यातून स्मिता लातूरकर तर अमरावती जिल्ह्यातुन कविता उंबरे, बुलढाणा जिल्ह्यातुन राजश्री माने, अकोला जिल्ह्यातुन सुनंदा सोनावणे, नागपूर जिल्ह्यातून स्नेहल भागवत, चंद्रपूर जिल्ह्यातुन मेघा रामगुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाडांना राखी बांधण्यात आल्या.