ETV Bharat / state

अल्‍पवयीन शाळेकरी मुलींशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला बेडया

शाळेतील दोन मुलींशी शिक्षक अश्‍लील चाळे करीत होता. गेल्‍या ७ ते ८ महिन्‍यांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र, शाळेत नव्याने रूजू झालेल्‍या शिक्षिकेला पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांना व ग्रामस्थांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी नित्यानंदला चोपला व त्याला पोलिसांच्या हवाली केले.

author img

By

Published : Jul 22, 2019, 3:25 PM IST

प्रतिकात्मक चित्र

रायगड- चिमुरड्या शाळकरी विद्यार्थींनीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला फलाणी ग्रामस्‍थांनी चोप देऊन पोलिसांच्‍या हवाली केले आहे. पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्‍हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नित्‍यानंद धोंडू पाटील असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.

नित्यानंद हा माणगाव तालुक्‍यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत आहे. शाळेतील दोन मुलींशी तो अश्‍लील चाळे करीत होता. गेल्‍या ७ ते ८ महिन्‍यांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र, शाळेत नव्याने रूजू झालेल्‍या शिक्षिकेला पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांना व ग्रामस्थांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी नित्यानंद पाटील आणि शिक्षिकाच्या पत्नीला फलाणी येथे बोलावून घेतले. गावकऱ्यांकडून शिक्षकाला दम देताच नित्यानंद पाटील याने आपल्या विकृतीची कबुली दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी या शिक्षकाला चोप देवून गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

गोरेगाव पोलिसांनी नित्यानंद पाटील विरोधात भा.द.वि. कलम ३७६ (एच एफ ) पोस्को (बाल लैंगिक अत्‍याचार संरक्षण कायदा ) तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ (१) ( ११ ) अन्वये गुन्‍हा दाखल केला असून त्‍याला अटक केली आहे. नित्यानंद पाटील या शिक्षकाच्या कृत्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून निलंबीत केले आहे.

या घटनेमुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे. ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेतील शिक्षकांना सोपवतात, तेच शिक्षक विद्यार्थ्यांचे लैगिक शोषण करून शिक्षणासारखे क्षेत्र बदनाम करीत आहेत. शिक्षकच शालेय विद्यार्थिनींचे लैगिक शोषण करीत असतील, तर पालकांनी दाद कुणाला मागायची, असा पालकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.

Intro:

अल्‍पवयीन शाळकरी मुलींशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला बेडया 

रायगड : चिमुरडया शाळकरी विद्यार्थींनीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकांला फलाणी ग्रामस्‍थांनी येथेच्‍छ बदडून पोलीसांच्‍या हवाली केले. पोलीसांनी त्‍याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करून अटक केली आहे. शिक्षकाला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या घटनेनंतर निलंबित केले आहे.Body:नित्‍यानंद धोंडू पाटील असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. तो माणगाव तालुक्‍यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत आहे. शाळेतील दोन मुलींशी तो अश्‍लील चाळे करीत होता. गेल्‍या 7 ते 8 महिन्‍यांपासून हा प्रकार सुरू होता. शाळेत अलीकडेच नव्‍याने रूजू झालेल्‍या शिक्षिकेला या विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला.

     पालकांना व ग्रामस्थांना हा प्रकार कळल्यावर ग्रामस्थांनी नित्यानंद पाटील आणि शिक्षिका पत्नीला फलाणी येथे बोलावून घेतले. दम देताच नित्यानंद पाटील याने आपल्या विकृतीची कबुली देवून आपण हे कृत्य केल्याचा जबाब दिला. ग्रामस्थांनी या शिक्षकाला चोप देवून गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. Conclusion:गोरेगाव पोलिसांनी नित्यानंद पाटील विरोधात भा.द.विं. कलम 376 (एच एफ ) पोस्को (बाल लैंगिक अत्‍याचार संरक्षण कायदा ) तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3 (1) ( 11 ) अन्वये गुन्‍हा दाखल केला असून त्‍याला अटक करण्यात आली आहे.

या दुर्दैवी घटनेने पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे. ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षकाच्या ताब्यात सोपवतात तेच शिक्षक विद्यार्थ्याचे लैगिक शोषण करून शिक्षणासारखे क्षेत्र बदनाम करीत आहेत. शिक्षकच शालेय विद्यार्थ्यानीचे लैगिक शोषण करीत असतील तर पालकांनी दाद  मागायची तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

नित्यानंद पाटील या शिक्षकांच्या या कृत्यानंतर राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्याना निलंबीत केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.