ETV Bharat / state

Dummy Bomb Failure : पेणजवळ सात डमी बॉम्ब निकामी - suspicious gelatin stick

पेणजवळ ( Dummy bomb near Penan ) सापडलेली जिलेटिन स्टिकसारखी संशयास्पद वस्तू डमी बॉम्ब ( Dummy bomb ) असल्याचे निष्पन्न झाले आहे. सात तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद डमी बॉम्ब निकामी ( Dummy Bomb Failure ) करण्यात आले आहेत.

Dummy Bomb Failure
Dummy Bomb Failure
author img

By

Published : Nov 11, 2022, 8:46 PM IST

Updated : Nov 11, 2022, 9:20 PM IST

पेण-रायगड मुंबई-गोवा महामार्गावरील पेणजवळ भोगावती पुलाच्याखाली संशयास्पद आढळून आलेल्या जिलेटीन कांड्यासारखी दिसणारी ती वस्तू ही डमी बॉम्ब ( Dummy bomb near Penan ) असल्याचे निष्पन्न झालं असून सुमारे सात तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी ( Dummy Bomb Failure ) करण्यात आला. गोवा हायवेवरील पेणनजीक भोगावती पुलाच्याखाली संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब ( Dummy bomb ) असल्याचे निष्पन्न झालं आहे.

पेणमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ - सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जिलेटन कांड्या सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यातच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडच्या पेणमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे.

12 जिलेटीन सदृश्य कांड्या - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळली होती. भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला 10 ते 12 जिलेटीन सदृश्य कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. काल सायंकाळी भोगावती नदीपात्रात पाय धुण्यासाठी गेलेल्या तरुणाला पाण्यामध्ये संशयास्पद वस्तू दिसून आली. या घटनेची माहिती त्याने तात्काळ पेण पोलिसांना देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्याच बरोबर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय पोलीस अधिकारी शुक्ला, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, नायब तहसीलदार कालेकर, खालापूर, रोहा, पोयनाड, रसायनी आदी ठिकाणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रात्र भर तळ ठोकून होते.

डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न - याचबरोबर नवी मुंबई, रायगड येथील बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा अलर्ट होऊन मुंबई-गोवा हायवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक रात्री 10 वाजता पासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अखेर सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदर संशयास्पद आढळून आलेल्या जिलेटीन कांड्या सदृश्य वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामध्ये वायर, पाईप, घड्याळ आहे. त्यामुळे धोकादायक किंवा स्फोटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला असतानाच मात्र ती वस्तू कुणी, कोणत्या उद्देशाने ठेवली याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे.

Last Updated : Nov 11, 2022, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.