रायगड - खोपोली नगर परिषद हद्दीत 6 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, मेडिकल, किराणा, भाजीपाला, दूध व फळांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने व खासगी कार्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनाने लोकांच्या जीवनशैलीत झाला आहे बदल - शंकर फुलवले
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उचलले ठोस पाऊले
राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. कोविड - 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपात्कालीन उपाययोजना करणे आवश्यक होते, 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
सर्व ठिकाणातील धार्मिक स्थळे, सिनेमा हॉल, नाट्यगृह व सभागृह, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुल, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा व महाविद्यालये बंद ठेण्यात आले आहेत. तसेच, धार्मिक, सामाजिक, राजकीय व संस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा - तुराडे येथील तरुणाचा रेल्वेखाली चिरडून जागीच मृत्यू