ETV Bharat / state

गावी जाण्‍यासाठी परप्रांतीय मजुरांची धडपड; कागदपत्र, वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी

author img

By

Published : May 5, 2020, 3:32 PM IST

जिल्हा सामान्य रुगणालायत वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या असून येथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. रुग्णालय तसेच पोलीस प्रशासन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत.

stranded worker in raigad are waiting in Queue

रायगड - शासनाने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना त्याच्या राज्यात, गावात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार परराज्यातील नागरिक हे आपल्या गावी जायला मिळणार म्हणून आनंदित झाले असून कागदपत्र आणि वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी करू लागले आहेत.

stranded worker in raigad are waiting in Queue
गावी जाण्‍यासाठी परप्रांतीय मजुरांची धडपड; कागदपत्र, वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी

जिल्हा सामान्य रुगणालायत वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या असून येथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. रुग्णालय तसेच पोलीस प्रशासन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत.

गावी जाण्‍यासाठी परप्रांतीय मजुरांची धडपड; कागदपत्र, वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी
काहीही करून आपल्‍या राज्‍यात, आपल्‍या गावी जायचंच असा चंग जिल्ह्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी बांधला आहे आणि त्‍यासाठी त्‍यांचा आटापिटा सुरू आहे. सकाळपासूनच कागदपत्र जमवणे, नोंदणी करणे त्‍याचबरोबर वैद्यकीय चाचणी करून घेणे यासाठी झेरॉक्‍सचे दुकान, सायबर कॅफे असेल किंवा सरकारी रूग्‍णालये असतील याठिकाणी भल्‍यामोठया रांगा लावल्‍या जात आहेत. हे करत असताना कुठेही सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्‍यामुळे अधूनमधून पोलीसांना हस्‍तक्षेप करावा लागत आहे. आज सकाळपासूनच अलिबागच्‍या जिल्‍हा रूग्‍णालयासमोर 3 हजार मजूर रांगेत उभे होते.

परराज्यातील नागरिकांना प्रशासनामार्फत त्यांच्या गावी सोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, या नागरिकांच्या अति उत्साहीपणाचा ताप हा पोलीस तसेच रुग्णालय प्रशासनाला सहन करावा लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.