ETV Bharat / state

ई टीव्ही भारत स्पेशल : एसटी चालकांवर आली बिगारी होण्याची वेळ - st employees critical condition in lockdown

एच डी मानकर या चालक असलेल्या कर्मचाऱ्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे. आधीच कोरोनामुळे तीन महिन्यांपासून पगार एसटी प्रशासनाने दिलेला नाही. त्यात निलंबन, त्यामुळे घर चालवायचे कसे? हा प्रश्न मानकर यांना पडला होता. अखेर कुटूंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मानकर यांनी बिगारी काम करण्यास सुरुवात केली आहे.

st
एसटी चालकांवर आली बिगारी होण्याची वेळ
author img

By

Published : Aug 3, 2020, 9:47 PM IST

रायगड - कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या अलिबाग आगारातील एसटीच्या 31 चालक, वाहक यांनी एसटी प्रशासनाचे आदेश न पाळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एच डी मानकर या चालक असलेल्या कर्मचाऱ्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे. आधीच कोरोनामुळे तीन महिन्यांपासून पगार एसटी प्रशासनाने दिलेला नाही. त्यात निलंबन, त्यामुळे घर चालवायचे कसे? हा प्रश्न मानकर यांना पडला होता. अखेर कुटूंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मानकर यांनी बिगारी काम करण्यास सुरुवात केली आहे. बिगारीतून मिळणाऱ्या पैशातून ते आपल्या कुटूंबाचा गाडा चालवत आहेत. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी मानकर यांच्यासह इतर चालक, वाहक यांनी केली आहे.

एच डी मानकर - एसटी चालक, अलिबाग आगार

एच डी मानकर हे अमरावती जिल्ह्यातील सावंगी गावातील मूळ रहिवासी आहेत. 2012 साली मानकर हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग आगारात चालक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी इमाने इतबारे आपली सेवा सुरू ठेवली आहे. कोरोना काळातही ते आपली सेवा प्रवाशांना देत आहेत. एसटीची सेवा करीत असतानाही गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्यासह अनेकांचे वेतन हे मिळालेले नाही. त्यातच एसटी प्रशासनाने लावलेल्या ड्युटीवर जाण्यास मनाई केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. अशा कठीण परिस्थितीत घरची हलाकीची परिस्थिती झाली आहे.

एच डी मानकर हे अलिबाग वरसोली येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. पत्नी, दोन मुले त्यांच्यासोबत तर आई वडील गावी राहत आहेत. तीन महिने पगार नाही. अशावेळी घरभाडे कसे द्यायचे, घरातील अन्नधान्य कसे भरायचे, वृद्ध आई वडिलांना पैसे कसे पाठवायचे हा यक्षप्रश्न मानकर यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासकीय सेवेत असूनही कुटूंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मानकर यांनी बिगारी काम करण्यास सुरुवात केली आहे. बिगारी कामातून मिळणाऱ्या पैशातून सध्या ते आपला चरितार्थ चालवत आहेत. कोरोनाकाळात मानकर यांच्यासह एसटीतील अनेक कर्मचाऱ्यांवर घरखर्च चालवण्याचा मोठा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. एसटी प्रशासनाने निलंबनाची कारवाई रद्द करून पगार वेळेत द्यावे, अशी मागणी मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शासन आणि प्रशासन यांच्याकडे केली आहे. अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीतीही निर्माण केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.