रायगड - जिल्ह्यातील अलिबाग, नागाव समुद्रकिनाऱ्यावर जहाजामधून तेल सांडले गेल्यामुळे तेलाचे तवंग लाटांसोबत किनाऱ्यावर आले आहे. या तवंगामुळे मासे व कासव यांसारख्या प्राण्यांचा जीव धोक्यात येऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होईल, असे असे पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश सावंत यांनी माहिती दिली आहे. या तवंगमुळे किनाऱ्याचे सौंदर्यदेखील बिघडले आहे.
समुद्रात मोठे जहाजाने माल वाहतूक केली जाते. या जहाजामधून तेल गळतीचे प्रकार घडत असतात. या तेल गळतीमुळे लाटांच्या साहाय्याने त्याचा तवंग समुद्र किनाऱ्यावर येत असतो. अलिबाग, नागाव येथील समुद्र किनाऱ्यावर तेल तवंग पसरले आहे. या तवंगाचा समुद्रातील प्राण्यांवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे समुद्र किनाराही काळवंडला आहे.
समुद्रात मालवाहू जहाजांमधून सांडलेले हे तेल मंग्रोज (खारफूटी) मध्ये अडकले जाते. त्यामुळे तेथे अंडी घालण्यासाठी येणाऱ्या मासे व पिल्ले यांचा जीव धोक्यात येत असतो. तसेच समुद्र किनारी विहार करीत असलेले कासवांच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. या तवंगामुळे समुद्र किनाऱ्यांचे सौन्दर्य खराब झाल्याने पर्यटकही येण्यास निरुत्साही असतात. त्यामुळे पर्यटनावरही परिणाम होत असतो. असे पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश सावंत यांनी म्हटले आहे.