ETV Bharat / state

कोरोनाने बापाचा मृत्यू, ग्रामस्थांसह सख्ख्या दोन मुलांचाही खांदा देण्यास नकार - पोलीस, सर्कल, पत्रकारांनी कोरोना मृतावर अंत्यसंस्कार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. मात्र, सख्ख्यी दोन मुलं सुध्दा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आली नाहीत. त्यांनी आपल्या वडिलांच्या तिरडीला खांदा देण्यासाठी नकार दिला. अशी घटना रायगडच्या म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथे पाहायला मिळाली.

raigad
रायगड
author img

By

Published : May 1, 2021, 7:59 PM IST

रायगड - मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ एकत्रित येऊन मृत व्यक्तीची प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यविधी करतात. त्यानंतर त्याचे उत्तरकार्य, दशकार्य केले जाते. मात्र, कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला ना नातेवाईक ना ग्रामस्थ; रुग्णालयातील आरोग्य सेवकच त्याचे अंत्यविधी करतात. शिवाय कोरोना रूग्णाचे नातेवाईकही मृत्यूनंतर त्याची अवहेलना करतात. अशीच काहीशी परिस्थिती म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथे पाहायला मिळाली. येथील गोविंद जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर गावातील लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाहीत, पण त्यांच्या सख्या दोन मुलांनीही वडिलांचे दहन करण्यास नकार दिला. अखेर म्हसळा पोलीस, तहसील कर्मचारी, पत्रकार आणि रूग्णवाहिका चालकाने जाधव यांचा अंत्यविधी केला.

कोरोनाच्या भीतीने मुलांसह ग्रामस्थांचा नकार

म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव (वय 76) हे कोरोनाग्रस्त झाले होते. गोविंद जाधव हे घरीच कोरोनावर उपचार घेत होते. 30 एप्रिल 2021 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू पावल्यानंतर पुढचा अंत्यविधी करण्याबाबत नातेवाईक, गावातील ग्रामस्थांनी नकार दिला. जाधव यांच्या दोन सख्या मुलांनीही वडिलांच्या अंत्यविधीला नकार दिला. त्यामुळे गोविंद जाधव यांचा अंत्यविधी करण्याचा मोठा पेच प्रसंग उभा राहिला.

पोलीस, सर्कल, पत्रकार, रूग्णवाहिका चालकाने दाखवली माणुसकी

गोविंद जाधव यांच्या बाबत माहिती म्हसळा पोलिसांना कळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांनी पुढाकार घेऊन संतोष चव्हाण, सूर्यकांत यांना त्वरित घटनास्थळी पाठविले. त्याच्यासोबत म्हसळा तहसील कार्यालयाचे सर्कल दत्ता करचे, पत्रकार निलेश कोकचा आणि रूग्णवाहीका चालक शरद नांदगावकर, भरत चव्हाण हे सुद्धा आले. शरद नांदगावकर यांनी सर्वांना पीपीई किटची उपलब्धता करून दिली. त्यानंतर या सर्वांनी तिरडी बांधून जाधव यांची 2 किमी स्मशानभूमीपर्यंत खांद्यावर अंत्ययात्रा काढली. तेथे गोविंद जाधव यांना अग्नी दिला.

अशी वेळ न येण्याबाबत जनजागृती महत्त्वाची

कोरोनाने मृत पावलेल्या जाधव यांच्या अंत्यविधीला ग्रामस्थांसह स्वतःच्या मुलांनीही नकार दिला. असे असले तरी पोलीस, महसूल प्रशासन, पत्रकार, रूग्णवाहिका चालक यांनी माणुसकी दाखवून एक सत्कार्य केले. मात्र, अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.

हेही वाचा - 'पश्चिम बंगालमध्ये लढत अटीतटीची, पण सत्ता ममता बॅनर्जींचीच येणार'

हेही वाचा - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.