ETV Bharat / state

तिथीनुसार किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा - रविंद्र चव्हाण

तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगड किल्ल्याचा परिसर हा भगवामय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणून गेला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा
author img

By

Published : Jun 15, 2019, 12:24 PM IST

रायगड - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर गेली २४ वर्ष श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. आज तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगड किल्ल्याचा परिसर हा भगवामय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणून गेला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे. सकाळी ६ वाजता झेडपी शेडमधून पालखीचे प्रस्थान झाले. सकाळी साडेसहा वाजता नगारखान्यासमोर भव्य ध्वजारोहण करण्यात आले. राजदरबार येथे वक्ते सौरभ करडे यांचे व्याख्यान उपस्थितांसमोर झाले. सकाळी ७ वाजता शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास प्रारंभ होऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ इतिहासतज्ञ आप्पा परब आणि मुंबईयेथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष धनावडे दाम्पत्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या जंगम समुहाकडून मंत्रोच्चार सुरू होता.

रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सिंहासनावर विराजमान झालेल्या शिवपुतळ्यावर सुवर्ण नाण्यांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवदर्शन सोहळा झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. होळीच्या माळावरील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मिरवणूकीत शस्त्र प्रात्याक्षिके, विविध तलवारबाजीचे खेळ, लेझीम नृत्य, ढोलपथकाची कारागीरी असे विविध कार्यक्रम होळीच्या माळरानावर करण्यात आले.

यावेळी हजारो शिवभक्त पावसाचे वातावरण असताना उपस्थित राहिले होते. तर जिल्हा पोलीस दलाकडूनही किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Intro:तिथीनुसार किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा

रायगड : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर गेली 24 वर्ष श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्र मंडळ व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्यभिषक सोहळ्याला हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगड किल्ल्याचा परिसर हा भगवामय व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणून गेला आहे.

यंदा हि तिथी 15 जून रोजी येत असल्याने महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी संस्थांचे हजारो शिवकार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थिती लावतील असा विश्वास या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले व  कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केला आहे.Body:जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झाला आहे. सकाळी 6 वाजता झेडपी शेडमधून पालखीचे प्रस्थान झाले. सकाळी 6-30 वाजता नगारखाना समोर भव्य ध्वजारोहण करण्यात आले. राजदरबार येथे वक्ते सौरभ करडे यांचे व्याख्यान उपस्थितांसमोर झाले. सकाळी 7-00 वाजता शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास प्रारंभ होऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, कोकणकडाचे  यांचे उपस्थितीत जेष्ठ इतिहासतज्ञ आप्पा परब व मुंबईयेथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष धनावडे दाम्पत्य यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. राजपुरोहीत प्रकाश स्वामी जंगम याच्या जंगमसमूहाकडून मंत्रोच्चार सुरू होता. Conclusion:रविंद्र चव्हाण यांचे हस्ते सिंहासनावर विराजमान झालेल्या शिवपुतळ्यावर सुवर्णनाणी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवदर्शन सोहळा झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. होळीच्या माळावरील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मिरवणूकीत शस्त्र प्रात्याक्षिके, विविध तलवारबाजीचे खेळ, लेझीम नृत्य, ढोलपथकाची कारागीरी असे विविध कार्यक्रम होळीच्या माळरानावर करण्यात आले.

यावेळी हजारो शिवभक्त पावसाचे वातावरण असताना उपस्थित राहिले होते. तर जिल्हा पोलिस दलाकडूनही किल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.