रायगड - अलिबाग पेण मार्गावर तिनवीरा धरणाजवळ भरधाव वेगात निघालेल्या दुचाकीने डंपरला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर अन्य दोघे जखमी आहेत.
योगेश रामबकास उमरिया असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संदीप थळे व शादाब छपेकर हे जखमी आहेत. संदीप थळे याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
हे तिघे मोटारसायकलवरून अलिबाग येथून पेणच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुढे चाललेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या डंपरवर त्यांची दुचाकी आदळून हा अपघात झाला.