ETV Bharat / state

सुरक्षा रक्षकानेच केली युनिव्हर्सिटीत चोरी, पनवेलच्या अमिटी युनिव्हर्सिटीतील प्रकार - stolen

त्यात अमिटी युनिव्हर्सिटीमधलाच सुरक्षा रक्षक  उदय मदन भगत हा घटनेच्या वेळी क्लासरूम मध्ये जाताना दिसला. त्यानंतर थोड्याच वेळात तो क्लासरूममधील दोन यूपीएस हातात घेऊन बाहेर पडताना आढळून आला.

अमिटी युनिवर्सिटी
author img

By

Published : Nov 19, 2019, 1:59 AM IST

पनवेल - सोमटणे येथील अमिटी युनिव्हर्सिटीमधील क्लासरूममधून यूपीएसची चोरी करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. उदय भगत असे या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. या चोरीचा उद्देश मात्र अद्याप उघड झाला नाही.

काही दिवसांपूर्वी ११ नोव्हेंबर रोजी पनवेलच्या अमिटी युनिव्हर्सिटीतील क्लासरूम नंबर ३०५ आणि ३२२ मधून दोन यूपीएस चोरीला गेले होते. याबाबत तिथल्या कर्मचाऱ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात अमिटी युनिव्हर्सिटीमधलाच सुरक्षा रक्षक उदय मदन भगत हा घटनेच्या वेळी क्लासरूम मध्ये जाताना दिसला. त्यानंतर थोड्याच वेळात तो क्लासरूममधील दोन यूपीएस हातात घेऊन बाहेर पडताना आढळून आला.

हेही वाचा - माणगाव स्फोट प्रकरण : क्रिपझो कंपनीच्या मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल

उदय भगत हा द टॅलेंट टीम सिक्युरिटी या संस्थेच्या माध्यमातून अमिटी युनिव्हर्सिटीत नव्यानेच सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. क्लासरूममधील यूपीएस चोरी भगत यानेच केल्याचे स्पष्ट दिसल्यानंतर अमिटी युनिव्हर्सिटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार पनवेल पोलिसांनी ताबडतोब उदय भगत याला अटक केली.

Intro:सोबत AV जोडली आहे

पनवेल

पनवेलमधल्या सोमटणे इथे असलेल्या अमिटी युनिव्हर्सिटीत क्लासरूम मधील यूपीएसची चोरी करणाऱ्या एका सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आलीये. उदय भगत असे या सिक्युरिटी गार्डचं नाव असून त्याने क्लासरूममधील यूपीएसची चोरी नेमकी कशासाठी केली होती? याबाबत चर्चा अमिटी युनिव्हर्सिटीत रंगली आहे.
Body:काही दिवसांपूर्वी 11 नोव्हेंबर रोजी पनवेलच्या अमिटी युनिव्हर्सिटीतील क्लासरूम नंबर 305 आणि 322 मधून दोन यूपीएस चोरीला गेले होते. याबाबत तिथल्या कर्मचाऱ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना ही माहिती दिल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात अमिटी युनिव्हर्सिटीमधलाच सिक्युरिटी गार्ड उदय मदन भगत हा घटनेच्या वेळी क्लासरूम मध्ये जाताना दिसला. त्यानंतर थोड्याच वेळात तो क्लासरूममधील दोन यूपीएस हातात घेऊन बाहेर पडताना आढळून आला. उदय भगत हा द टॅलेंट टीम सिक्युरिटी या संस्थेच्या माध्यमातून अमिटी युनिव्हर्सिटीत नव्यानेच सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागला होता. क्लासरूममधील यूपीएस चोरी सिक्युरिटी गार्ड उदय भगत यानेच केल्याचं स्पष्ट दिसल्यानंतर अमिटी युनिव्हर्सिटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार पनवेल पोलिसांनी ताबडतोब सूत्र हलवत उदय भगत याला अटक ही केली.
Conclusion:परंतु युनिव्हर्सिटीच्याच सिक्युरिटी गार्डने क्लासरूममधील यूपीएस चोरी का केली याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. सिक्युरिटी गार्ड भगत याने यूपीएस चोरी करून त्यातील डेटा चोरण्याचा काही कट होता की यामागे आणखी कुणाचा हात आहे? याबाबत अधिक तपास पनवेल पोलीस करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.