ETV Bharat / state

सावित्री, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

सावित्री आणि कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठच्या सर्व गावांना, वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महाडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

पूर स्थिती
author img

By

Published : Jul 8, 2019, 8:43 PM IST

रायगड - जिल्ह्यात पावसाने सोमवारी सकाळपासून जोरदार सुरुवात केल्याने सावित्री आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. महाड येथे सावित्री तर रोहा येथे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण विभागाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पूर स्थिती

खोपोली, रोहा, नागोठणे, अलिबाग, महाड, पोलादपूर या तालुक्यात सकाळ पासून पावसाने मुसळधार सुरुवात केली होती. त्यामुळे महाड येथे सावित्री तर रोहा येथे कुंडलिका या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. सावित्री नदीची इशारा पातळी 6 मीटर असून पाणी पातळी 7 मीटर झाली, त्यामुळे सावित्री पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. महाड शहरातील बाजारपेठ, घरे आणि दुकानात पाणी घुसल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

रोहा येथे कुंडलिका नदीची इशारा पातळी 23 मीटर असून पाणी पातळी 24 मीटर आहे. त्यामुळे शहरात पाणी घुसून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खोपोली शहरातही पावसाचे पाणी साचल्याने शहरातील काही भाग पाणीमय झाला.

आज पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये

अलिबाग 6.00 , पेण 86.20, मुरुड 88.00, पनवेल 15.00,उरण 13.00, कर्जत 39.20, खालापूर 66.00, माणगांव 50.00, रोहा 39.00, सुधागड 44.00, तळा 79.00, महाड 42.00, पोलदपूर 35.00, म्हसळा 21.00, श्रीवर्धन 40.00, माथेरान 71.00
एकूण 734.40 मिमी
सरासरी : 45.90 मिमी .

Intro:
जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका नदीने ओलांडली धोक्याची पातळी

महाड मध्ये पुरसदृश्य परिस्थिती

जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

रायगड : जिल्ह्यात पावसाने सकाळपासून जोरदार सुरुवात केली असून महाड येथील सावित्री तर रोहामधील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरात बाजारपेठेत पाणी घुसले असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आपत्ती विभागाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.Body:जिल्ह्यात खोपोली, रोहा, नागोठणे, अलिबाग, महाड, पोलादपूर या तालुक्यात पावसाने सकाळ पासून मुसळधार सुरुवात केली होती. त्यामुळे महाड मधील सावित्री, रोहा येथील कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीची 6 मीटर इशारा पातळी ओलांडून 7 मीटर झाली आहे. त्यामुळे सावित्री पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. तर महाड शहरात बाजारपेठेत पाणी घुसल्याने शहरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी घुसले आहे.

रोहा कुंडलिका नदीची इशारा पातळी 23 मीटर असून आताची पातळी 24 मीटर आहे. त्यामुळे शहरात पाणी घुसून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर खोपोली शहरातही पावसाचे पाणी साचल्याने शहरातील गल्या पाणीमय झाल्या आहेत.Conclusion:सावित्री व कुंडलिका नदीच्या पातळीत वाढ होत असल्याने नदी काठच्या गावांना, वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

आज पडलेला पाऊस 

 अलिबाग  6 मि.मि., पेण 86.20, मुरुड  88.00 पनवेल 15.00, उरण 13.00, कर्जत 39.20, खालापूर 66.00, माणगांव 50.00,  रोहा 39.00, सुधागड 44.00, तळा 79.00, महाड 42.00, पोलादपूर 35.00, म्हसळा 21.00, श्रीवर्धन  40.00, माथेरान 71.00मि.मि.

 एकूण   734.40

सरासरी :  45.90 मिमी .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.